शिबानी दांडेकरच्या आरोपानंतर सुशांतचा भावोजी अंकिताच्या मदतीला, म्हणाला - तुझ्या हिंमतीला सलाम!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 02:01 PM2020-09-11T14:01:54+5:302020-09-11T14:06:34+5:30
नुकताच शिबानी दांडेकरने अंकितावर आरोप केला होता की, अंकिता प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहे. मात्र, आता सुशांतचा भावोजी विशाल सिंह किर्तिने एक ट्विट केलंय. ज्यात त्याने अंकिताला या सगळ्या गोष्टींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिलाय.
सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सुरूवातीपासूनच त्याची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे त्याच्या परिवारासोबत उभी आहे. ती सुशांतच्या न्यायाची मागणी करत त्याच्या बहिणींना सपोर्ट करत आहे. नुकताच शिबानी दांडेकरने अंकितावर आरोप केला होता की, अंकिता प्रसिद्धीसाठी हे सगळं करत आहे. मात्र, आता सुशांतचा भावोजी विशाल सिंह किर्तिने एक ट्विट केलंय. ज्यात त्याने अंकिताला या सगळ्या गोष्टींवर लक्ष न देण्याचा सल्ला दिलाय.
सुशांतची बहीण श्वेता सिंहचा पती विशाल किर्तिने अंकिता लोखंडेसाठी ट्विटमध्ये लिहिले की, 'डिअर अंकिता, पेड पीआरच्या या टोमण्यांना कृपया सीरीअसली घेऊ नकोस. तुझी साथ परिवारासाठी महत्वाची आहे. जे लोक सुशांतसाठी न्यायाची मागणी करत आहेत, त्यांच्यावर अटॅक करण्याचा हा प्रयत्न आहे. कारण तू या सर्व गोष्टी एकदम योग्य पद्धतीने समोर मांडल्या आहेत. आपण सर्वांना फक्त सत्य जाणायचं आहे. तुला आणि तुझ्या बहादुरीला सलाम'.
Dear @anky1912. Please don’t take the jibes made by paid PR seriously. Your support means a lot to the family. This is an organized effort to attack people who want #Justice4SSR.As you have correctly pointed out,all we want is to know the truth. More power to you for your bravery https://t.co/OXhGwyyQVW
— vishal kirti (@vikirti) September 10, 2020
शिबानीचा अंकितावर आरोप
काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीने एका मुलाखतीतून अंकिता लोखंडेवर निशाणा साधला होता. ती म्हणाली होती की, अंकिता सुशांतच्या विधवेसारखी रिअॅक्ट करत आहे. यावर अंकितानेही तिला उत्तर दिलं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी रियाची मैत्रीण शिबानी दांडेकरने अंकिताबाबत लिहिलं होतं की, तिला २ सेकंदाची पब्लिसिटी हवी आहे.
This woman clearly wants her 2 seconds of fame and has capitalised on Rhea being targeted because she has had never dealt with her own relationship issues with Sushant.. she has been the driving force behind this and she needs to be called out! https://t.co/egM6iZRuHU
— shibani dandekar (@shibanidandekar) September 10, 2020
अंकिताचं शिबानीला उत्तर
आपल्या पोस्टमध्ये अंकिताने तिच्या करिअरबाबत सांगितलं आहे. ती म्हणाली की, टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांना कधीही कमी समजू नये. यात तिने तिच्या पवित्र रिश्तापासून सुरू झालेल्या करिअरचा उल्लेख केलाय. ती पुढे म्हणाली की, कशाप्रकारे ती अर्चनाच्या भूमिकेशी जुळली आणि आजही जुळलेली आहे. नंतर तिने मणिकर्णिका आणि बागी ३ मध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबाबत सांगितलं. शेवटी अंकिताने हेही सांगितलं की, कशाप्रकारे १७ वर्षांपासून मनोरंजन इंडस्ट्रीचा भाग आहे.
अंकिताच्या या ओपन लेटरवर फॅन्स भरभरून रिअॅक्शन देत आहेत. सोबत उतरन आणि बिग ब़ॉस १३ मध्ये दिसलेल्या अभिनेत्री रश्मी देसाईने अंकिताला सपोर्टही केला आहे. सुशांत आणि अंकिताच्या फॅन्सने या ओपन लेटरचं कौतुक केलंय आणि फॅन्स कमेंट करून अंकिताला सपोर्ट करत आहेत.
हे पण वाचा :
कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'
'टीव्हीवर काम करणाऱ्यांना कमी समजू नको', रियाची मैत्रीण शिबानीला अंकिताचं सडेतोड उत्तर
हे सारं पब्लिसिटीसाठी...! शिबानी दांडेकर बोलली, अंकिता लोखंडेच्या फॅन्सची सटकली
'या' अभिनेत्याने 'भगत सिंह' यांच्याशी केली कंगनाची तुलना, वाचा नेमका काय म्हणाला!