वर्ष उलटलं तरी सुशांतच्या मृत्यूचे गुढ कायम, उषा नाडकर्णी यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 01:01 PM2021-06-13T13:01:30+5:302021-06-13T13:05:36+5:30

सुशांतच्या निधनाला १४ जूनला वर्ष पूर्ण होणार आहे. याच निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनीदेखील सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

sushant singh rajput cant commit suicide why isnt investigation completed even though year is over says usha nadkarni | वर्ष उलटलं तरी सुशांतच्या मृत्यूचे गुढ कायम, उषा नाडकर्णी यांचा सवाल

वर्ष उलटलं तरी सुशांतच्या मृत्यूचे गुढ कायम, उषा नाडकर्णी यांचा सवाल

googlenewsNext

अतिशय प्रतिभावान कलाकार म्हणून सुशांत सिंग राजपूतने आपली ओळख निर्माण केली होती. अभिनयाने त्याने रसिकांची पसंती मिळवली होती. छोट्या पडद्यापासून सुरु झालेला त्याचा प्रवास मोठ्या पडद्यापर्यंत पोहचला. अल्पाधीतच सुशांत रसिकांचा लाडका अभिनेता बनला होता. मात्र गेल्या वर्षी १४ जूनला त्याने आत्महत्या करत जगाचा कायमचा निरोप घेतला. 

सुशांतच्या निधनाची बातमीने सा-यांनाच मोठा धक्का बसला होता. सुशांतच्या निधनाला आता वर्ष व्हायला आले तरीही त्याचे मृत्युचे गुढ आजही कायम आहे. सुशांतच्या जवळच्या काही कलाकारांनीही अनेकदा त्याच्या मृत्युचे कारण आत्महत्या असूच शकत नसल्याचे सांगितले. कारण तो हार मानणार अभिनेता नव्हता. सुशांतने आत्महत्या करण्यासाखे टोकाचे पाऊल उचलण्याने त्याच्या कुटुंबासह इंडस्ट्रीतील कलाकरामंडळींना देखील आजही या गोष्टीवर विश्वास बसत नाहीय. 

 

सुशांतच्या निधनाला १४ जूनला वर्ष पूर्ण होणार आहे. याच निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी देखील एबीमाझाला दिलेल्या मुलाखतीत सुशांतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पवित्र रिश्ता या मालिकेमुळे उषा नाडकर्णीचा सुशांत चांगलाच परिचयाचा होता. पवित्र रिश्ता मालिकेच्यावेळी  अवघ्या २३- २४ वय सुशांतचे असावे. अतिशय मनमौजी असा तो होता. सेटवरही सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा. नेहमी तो मला बोलायचा. ताई मुंबईमध्ये आपले घर घेण्याचे स्वप्न आहे. मुंबईत घर घेण्यासाठी खूप पैसे लागतात असे मी त्याला म्हणायची. सुशांत यावर नेहमी म्हणायचा. करेंगे ताई कुछ तो पर अपना भी घर होगा. त्याला इंडस्ट्रीत पुढे काय करायचे आहे याचे त्याच्याकडे प्लॅनिंग होते. 

एक उत्तम कलाकार होता. असा मुलगा कसं काय आत्महत्या करु शकतो ? सुशांत आत्महत्या करु शकतो यावर विश्वास नसल्याचे उषा नाडकर्णी यांनी सांगितले. आजही माझं मनं सांगतंय त्याची हत्याच झाली असणार. गेल्या वर्षभरापासून त्याच्या आत्महत्येवर शोध सुरु आहे अजून कसे काही हाती लागली नाही. मोठ्या मोठ्या तपास यंत्रणा याचा शोध घेत आहे. वर्ष झाले तरी सुशांतच्या मृत्युचे कारण समोर आलेले नाही. 

सुशांत गेल्याची बातमी हेअर ड्रेसरने सांगितली. तेव्हा ऐकून मला फार धक्का बसला.आजही सुशांत नाही यावर विश्वासच बसत नसल्याचे त्या सागंतात सत्य लवकरात लवकर समोर यावे हीच ईच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Web Title: sushant singh rajput cant commit suicide why isnt investigation completed even though year is over says usha nadkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.