४५ महिने झाले तरीही... सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना भावूक आवाहन, CBI तपासावर प्रश्नचिन्ह?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 01:09 PM2024-03-14T13:09:33+5:302024-03-14T13:13:31+5:30

सुशांत सिंग राजपूतच्या बहिणीने पंतप्रधान मोदींना भावूक आवाहन केलंय

Sushant singh rajput sister's appeal to PM Modi for intervention in cbi investigation | ४५ महिने झाले तरीही... सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना भावूक आवाहन, CBI तपासावर प्रश्नचिन्ह?

४५ महिने झाले तरीही... सुशांतच्या बहिणीचं पंतप्रधान मोदींना भावूक आवाहन, CBI तपासावर प्रश्नचिन्ह?

दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग कीर्ती सुशांतच्या मृत्युबद्दल खेद व्यक्त करत सोशल मीडियावर चर्चेत असते. आता श्वेताने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संपर्क साधलाय. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) तपासाला गती देण्यासाठी पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी तिने केली आहे.

एका व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये श्वेताने सुशांतच्या निधनानंतर ४५ महिने झाले तरीही तपास एजन्सीकडून अपडेट न मिळाल्याबद्दल खेद व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी या प्रकरणात लक्ष घातल्याने केवळ तपासाला गती मिळणार नाही तर या प्रकरणामुळे दु:खी झालेल्या चाहत्यांना थोडा दिलासा मिळेल असं श्वेताचं म्हणणं आहे. श्वेताने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय  की, "माझ्या भावाचे निधन होऊन 45 महिने झाले आहेत. आम्ही अद्याप उत्तर शोधत आहोत, पीएम मोदीजी कृपया आम्हाला मदत करा आणि सीबीआय या तपासात किती मुळापर्यंत पोहोचली आहे ते शोधा."


सुशांतची बहीण श्वेता पुढे म्हणाली, "मोदीजी, तुम्ही या प्रकरणाकडे लक्ष दिले तर आम्हाला कळेल की सीबीआय त्यांच्या तपासात कुठवर पोहोचली आहे. चाहत्यांना अद्याप सुशांतच्या मृत्यूचे उत्तर मिळालेले नाही आणि सुशांतला न्याय मिळावा म्हणून ते दररोज प्रार्थना करतात. तुमच्याकडून आम्हाला आशा आहेत. सुशांतच्या चाहत्यांना 14 जूनला माझ्या भावाचे काय झाले हे जाणून घ्यायचे आहे."  असं म्हणत श्वेताने CBI च्या तपासावर प्रश्नचिन्ह ठेवलं आहे.

Web Title: Sushant singh rajput sister's appeal to PM Modi for intervention in cbi investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.