सुशांतच्या पर्सनल डायरीतील गायब पाने रहस्य उलगडणार? सिद्धार्थच्या जबाबामुळे संशय वाढला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 12:32 PM2020-08-07T12:32:03+5:302020-08-07T12:35:19+5:30
सुशांत सिंह राजपूत केस दिवसेंदिवस किचकट होत चालली आहे. या केसची चौकशी नव्याने बिहार पोलिसांनी सुरू केली होती. आता ही केस सीबीआयच्या हाती गेली आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या डायरीसोबत छेडछाडप्रकरणी आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. मीडियाला मिळालेल्या त्याच्या पर्सनल डायरीची काही पाने गायब आहेत. सुशांतच्या चुलत भावाने सांगितले की, त्याच्यासमोर पोलीस डायरी घेऊन गेले होते. पण माहीत नव्हतं की, ते छेडछाड करतील. तर सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीने दोन प्रकारचे जबाब दिल्याने याप्रकरणी संशय वाढत आहे. सुशांतच्या डायरीची ६ पाने गायब आहेत.
सुशांत सिंह राजपूत केस दिवसेंदिवस किचकट होत चालली आहे. या केसची चौकशी नव्याने बिहार पोलिसांनी सुरू केली होती. आता ही केस सीबीआयच्या हाती गेली आहे. टाइम्स नाउच्या हाती सुशांतची पर्सनल डायरी लागली आहे. दावा केला जात आहे की, या डायरीची काही पाने फाडली गेली आहेत. याबाबत सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार बबलू म्हणाला की, 'सुशांत डायरी लिहायचा. माझ्यासमोर पोलीस ४ ते ४ डायरी घेऊन गेले होते. मला वाटलं होतं की, पोलीस नेत आहेत म्हणजे चांगली बाब आहे. मला नव्हतं माहीत की, ते पुराव्यासोबत छेडछाड करतील. मुंबई पोलिसांचा चेहरा सर्व देशासमोर आला आहे'.
सुशांतच्या डायरीची पाने फाटल्याप्रकरणी सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीने २ प्रकारचे जबाब दिले होते. त्यामुळे हे प्रकरण संशयास्पद झालं आहे. सिद्धार्थ आधी म्हणाला होता की, त्याला डायरीची पाने फाटलेली बघितली नाहीत. त्यानंतर तो म्हणाला की, सुशांत स्वत: डायरीची पाने फाडत होता.
सुशांतची फॅमिली फ्रेन्ड नीलोत्पल मृणाल हिनेही सांगितले की, फाटलेल्या पानांची चौकशी व्हायला पाहिजे. रिया नक्कीच काहीतरी लपवत आहे. ती म्हणाली की, कुणी काहीही लिहू शकतं किंवा काहीही लपवलं जाऊ शकतं. मृणाल म्हणाली की, फिंगर प्रिंट्सही चेक केले जावे. कारण डायरीवरून फिंगर प्रिंट्स मिटवले जात नाहीत.
हे पण वाचा :
रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समधून झाले धक्कादायक खुलासे, सुशांतच्या वकिलांंनी उपस्थित केले प्रश्न
प्रकरण ताब्यात घेताच सीबीआयचा रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा