खुशखबर! सुशांत सिंग राजपूतचा MS Dhoni सिनेमा या तारखेपासून पुन्हा थिएटरमध्ये झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 07:25 PM2024-07-04T19:25:31+5:302024-07-04T19:26:53+5:30
सुशांत सिंग राजपूतचा गाजलेला MS Dhoni the untold story सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरीही त्याच्या भूमिकांनी तो कायम प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सुशांतने त्याच्या करिअरमध्ये फार कमी काळात केलेल्या भूमिका लक्षवेधी ठरल्या. त्यापैकी सुशांतची गाजलेली भूमिका म्हणजे एम.एस.धोनी. MS Dhoni The untold story सिनेमात सुशांतने साकारलेली भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची भूमिका चांगलीच गाजली. सुशांतच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी. सुशांतचा गाजलेला MS Dhoni The untold story सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होतोय.
या तारखेपासून MS Dhoni सिनेमा पुन्हा रिलीज
सुशांत सिंग राजपूतची भूमिका असलेला MS Dhoni The untold story सिनेमा प्रचंड गाजला. सुशांतने सिनेमात साकारलेली धोनीची भूमिका अक्षरशः जो जगला होता. हा सिनेमा उद्या ५ जुलैपासून पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होतोय. ७ जुलैला असलेल्या धोनीच्या वाढदिवसानिमित्त हा सिनेमा पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. ५ जुलै ते ११ जुलै २०२४ या कालावधीत पीव्हीआर आयनॉक्स थिएटर्समध्ये हा सिनेमा पुन्हा एकदा प्रदर्शित केला जातोय. सुशांत आणि धोनीच्या फॅन्ससाठी ही पर्वणी असेल यात शंका नाही.
Celebrate the legend and his iconic journey on the big screen! Relive the highs, the lows, and everything in between with the re-release of MS Dhoni: The Untold Story, from July 5-11 at PVR INOX.
— INOX Movies (@INOXMovies) July 4, 2024
Book Ticket Now: https://t.co/eglrRcZRZS
.
.
.#MSDhoniTheUntoldStory… pic.twitter.com/5iEicsleTX
MS Dhoni सिनेमाविषयी..
सध्या देशभरात क्रिकेटचा चांगलाच माहोल आहे. अलीकडेच, भारतीय संघाने विश्वचषक T20 ट्रॉफी जिंकली. याशिवाय धोनीचा वाढदिवस आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आणि सिनेप्रेमी रसिकांना MS Dhoni The untold story सिनेमा पाहून पुन्हा एकदा मजा येईल यात शंका नाही. या सिनेमात सुशांतने माहीची प्रमुख भूमिका साकारलेली. याशिवाय कियारा अडवाणी, दिशा पाटनी, अनुपम खेर, भूमिका चावला, राजेश शर्मा, कुमुद मिश्रा अशा कलाकारांनी सिनेमात साकारलेल्या भूमिका लोकांच्या स्मरणात राहिल्या.