OMG ! सुश्मिता सेनला जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी घ्यावं लागायचं स्टेरॉइड...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 03:35 PM2019-06-04T15:35:04+5:302019-06-04T15:36:30+5:30

सुश्मिता सेन फिटनेसची अतिशय काळजी घेते. तिचे वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल. पण एकेकाळी हिच सुश्मिता इतकी आजारी पडली की, जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी तिला स्टेरॉइड घ्यावे लागायचे

sushmita sen fell very sick in 2014 had to take steroid every 8 hours to stay alive | OMG ! सुश्मिता सेनला जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी घ्यावं लागायचं स्टेरॉइड...!!

OMG ! सुश्मिता सेनला जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी घ्यावं लागायचं स्टेरॉइड...!!

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१४ साली ‘निरबाक’ या बंगाली चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर अचानक सुश्मिताला अस्वस्थ वाटू लागलं.

सुश्मिता सेन फिटनेसची अतिशय काळजी घेते. तिचे वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल. पण एकेकाळी हिच सुश्मिता इतकी आजारी पडली की, जिवंत राहण्यासाठी दर आठ तासांनी तिला स्टेरॉइड घ्यावे लागायचे. सुश्मिताने एका ताज्या मुलाखतीत हा खुलासा केला.
२०१४ मध्ये सुश्मिता गंभीर आजारी झाली. तिने सांगितले की,२०१४ साली ‘निरबाक’ या बंगाली चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आणि  अचानक मी आजारी पडले. मला काय होतंय हे कुणालाच कळेना.

एक दिवस मीअचानक बेशुद्ध पडले. यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे गेल्यावर  काही तपासण्या करण्यात आल्या आणि यादरम्यान माझ्च्या अ‍ॅड्रेनल ग्लॅण्ड्स (Adrenal Glands) या ग्रंथींमधील कोर्टिसोल (Cortisol) नावाचे हार्मोन्स तयार होणे बंद झाल्याचे मला कळले. त्यामुळे हळूहळू माझ्या शरीरातील अवयव निकामी होऊ लागले होते. यातून वाचण्यासाठी एकच पर्याय होता. तो म्हणजे,दर आठ तासांनी hydrocortisone हे स्टेरॉइड घेण्याचा.


सुश्मिता सांगितले की, ‘या आजारपणानंतरची पुढील दोन वर्ष माझ्यासाठी फार कठीण होती. या स्टेरॉइडमुळे माझे केस गळू लागले होते.  माझे वजन वाढू लागले होते. एकीकडे मी माजी विश्वसुंदरी होते. त्यामुळे मला सतत सुंदर दिसणे भाग होते. दुसरीकडे माझ्या दोन्ही मुलींना माझी गरज होती. त्याकाळात मी जणू वेडी झाले होते. २०१४ ते २०१६ या काळातील माझे फोटो तुम्ही पाहिले तर मी त्यात एकदम वेगळे दिसते. त्यामागेही हेच कारण होते.

मी उपचारासाठी लंडन, जर्मनीला गेले. त्याकाळात मी या आजाराशी लढण्याचा निर्धार केला. कारण मला एक आजारपणं घेऊन मरायचे नव्हते. मी योगसाधना सुरु केली. शरीरावर प्रचंड मेहनत घेतली. २०१६च्या अखेरिस माझी स्थिती बिघडली होती. मला अबुधाबीच्या एका रूग्णालयात नेले गेले. पुन्हा टेस्ट झाल्यात. पण मी परतत असताना आता मला स्टेरॉइड घ्यायची गरज नाही, असे मला सांगण्यात आले. कारण माझ्या शरीरात कोर्टिसोल बनणे सुरु झाले होते. हे ऐकून मी स्तब्ध झाले. मी त्या जीवघेण्या आजारातून बाहेर आले.

Web Title: sushmita sen fell very sick in 2014 had to take steroid every 8 hours to stay alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.