सुश्मिता सेनचे धडाक्यात पुनरागमन
By Admin | Published: August 26, 2015 05:05 AM2015-08-26T05:05:32+5:302015-08-26T05:05:32+5:30
मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन छोट्या पडद्याद्वारे कमबॅक करीत आहे. एका कॉमेडी शोमध्ये परीक्षक म्हणून ती दिसेल. काही जणांच्या मते तिचे हे पदार्पण आहे, मात्र २००८ साली एका चॅनेलवरील
मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन छोट्या पडद्याद्वारे कमबॅक करीत आहे. एका कॉमेडी शोमध्ये परीक्षक म्हणून ती दिसेल. काही जणांच्या मते तिचे हे पदार्पण आहे, मात्र २००८ साली एका चॅनेलवरील नृत्य स्पर्धेत तिने परीक्षक म्हणून काम पाहिले आहे.
त्या वेळी तिच्यासोबत परीक्षक म्हणून पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रम होते. टीआरपीमध्ये या शोला फारसे गौरविले नाही. लवकरच सर्व जण विसरून गेले. सुश्मिताच्या चित्रपट पुनरागमनाविषयी ज्यांना अधिक उत्साह होता, त्यांच्यासाठी छोट्या पडद्यावर तिचे परत येणे हे मानवलेले नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून तिच्या चित्रपटातील पुनरागमनाविषयी चर्चा होत होती. सुश्मितालादेखील आता मोठ्या पडद्यावर फारशी संधी नाही असे वाटते आहे. यासाठी छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाबाबत तिने होकार दिला. चित्रपटाबाबत म्हटले तर तिच्याकडे बंगाली चित्रपट आहे, जो लवकरच प्रदर्शित होईल. मात्र हिंदीत कोणताही चित्रपट नाही.
सुश्मिताजवळ सध्या एकही चित्रपट नाही २०१० साली तिचा शेवटचा चित्रपट ‘नो प्रॉब्लेम’ प्रदर्शित झाला होता. सुश्मिताने अशा चित्रपटांमधून कामे केली, ज्यामुळे तिचे चित्रपट करिअर संपले. २०१० साली प्रदर्शित झालेला ‘दुल्हा मिल गया’ याचा यात समावेश करावा लागेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक मुदस्सर अजीजसोबतचे तिचे संबंध त्या वेळी चर्चेत होते. याच संबंधातून तिने हा चित्रपट केल्याचे सांगण्यात आले. हा चित्रपट केवळ बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला नव्हे तर मुदस्सरसोबतचे तिचे संबंधही संपले. त्या वेळी मुदस्सरसोबतच्या तिच्या संबंधामुळे तिने अनेक चित्रपटांचे प्रस्ताव ठोकरले, ज्यामुळे तिला मोठे नुकसान सहन करावे लागले.
भावुक स्वभावाचा अनेकांनी घेतला फायदा
सुश्मिताने ज्या वेळी चित्रपटात पदार्पण केले, त्याचवेळी ऐश्वर्या रॉयचेहीं आगमन झाले होते. दोघींना एकमेकींची प्रतिस्पर्धी मानले जात होते. दोघींनी सोबत काम केले नाही. सुभाष घईसह अनेकांनी यासाठी प्रयत्न केले, मात्र कोणालाही यश आले नाही. सुश्मिताचे चित्रपट त्या काळी ज्या पद्धतीने गाजले, त्या वेळी तिला नंबर वनची अभिनेत्री मानले जात होते. सलमानसोबत ‘बिवी नंबर वन’, शाहरूखचा होम प्रॉडक्शन चित्रपट ‘मै हंू ना’, सलमानच्या ‘मैने प्यार क्यों किया’ने ती आणखी पुढे आली. विपुल शाहचा चित्रपट ‘आंखे’ आणि गोविंदाच्या ‘क्यों की मैं झूठ नही बोलता’च्या यशाने तिचे स्थान आणखी मजबूत झाले. ती स्वत:ला भावुक मानते.
- anuj.alankar@lokmat.com