बोलताही येईना अन् हसताही येईना! सुश्मिता सेनची का झाली अशी अवस्था? म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 10:46 AM2024-09-11T10:46:49+5:302024-09-11T10:47:29+5:30

अभिनेत्री सुश्मिता सेन काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्यातून सावरली.

sushmita sen struggles to speak and laugh because of toothache talks to paparazi | बोलताही येईना अन् हसताही येईना! सुश्मिता सेनची का झाली अशी अवस्था? म्हणाली...

बोलताही येईना अन् हसताही येईना! सुश्मिता सेनची का झाली अशी अवस्था? म्हणाली...

अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या धक्क्यातून सावरली. आता सुश्मिता आणखी एका दुखातपतीमुळे त्रस्त आहे. नुकतीच ती मुंबईतील डेंटल क्लिनिकमधून बाहेर आली. तेव्हा तिला बोलणंच काय तर हसणंही कठीण झालं. पापाराझींशी बोलताना तिने तिची अवस्था सांगितली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सुश्मिता सेन नुकतीच बांद्रा येथील एका डेंटल क्लिनिकमधून बाहेर पडली. तिच्यासोबत बॉयफ्रेंड रोहमन शॉलही होता. यावेळी पापाराझींशी बातचीत करताना ती म्हणाली, 'मी हसू शकत नाही. आवाजही अडखळून येतोय. दाताच्या दुखण्याने मी त्रस्त आहे. एनेस्थेशियामुळेही मला काहीच सुधरत नाही." यावर पापाराझी तिला म्हणाले, 'तू दोन तीन दिवसात बरी होशील'. तर सुश्मिता म्हणाली, 'एका दिवसात दुखणं कमी व्हायला हवं.' यानंतर ती कारमध्ये बसून निघाली.


सुश्मिता सेन शेवटची 'आर्या' वेबसीरिजच्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसली. तसंच याआधी तिने 'ताली' सीरिजमध्ये ट्रांसजेंडर गौरी सावंतची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये तिने आपण तीन वर्षांपासून सिंगल असल्याचं सांगितलं. रोहमन शॉलसोबत ब्रेकअपनंतरही ते दोघं सोबतच दिसतात. आम्ही केवळ मित्रच असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. 

Web Title: sushmita sen struggles to speak and laugh because of toothache talks to paparazi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.