पाटणा उच्च न्यायालयाची मल्लिकाच्या 'डर्टी पॉलिटिक्स'ला स्थगिती
By Admin | Published: March 4, 2015 03:49 PM2015-03-04T15:49:42+5:302015-03-04T15:49:42+5:30
मल्लिका शेरावतची भुमिका असलेला 'डर्टी पॉलिटिक्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पाटणा उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ४ - मल्लिका शेरावतची भुमिका असलेला 'डर्टी पॉलिटिक्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनाला पाटणा उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
या चित्रपटामध्ये अभिनेत्री मल्लिका शेरावतने भारताचा तिरंगा झेंडा अंगाभोवती गुंडाळला असल्याचे दाखवण्यात आले आहे. या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. संबंधित याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान पाटणा उच्च न्यायालयाने जो पर्यंत आक्षेपार्ह छायाचित्रण काढले जात नाही तोपर्यंत हा चित्रपट दाखवण्यावर बंदी घातली आहे. या चित्रपटामध्ये मल्लिका शेरावतने तिरंगा झेंडा अंगाभोवती गुंडाळला असून हा राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. डर्टी पॉलिटिक्स या चित्रपटाचे दिग्दर्शन के.सी . बोकाडिया यांनी केले असून हा चित्रपट येत्या ६ मार्च रोजी देशभरातील चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये मल्लिका शेरावत व्यतिरिक्त अभिनेता ओम पूरी, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी, आशुतोष राणा व अनुपम खेर यांचा अभिनय आहे.