हॅप्पी बर्थडे डार्लिंग...! हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खानला अर्सलनने दिल्या हटके शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 07:16 PM2021-10-26T19:16:58+5:302021-10-26T19:18:33+5:30
Sussanne Khan Birthday : सुजैनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुजैन व अर्सनलच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आला आहे. कारण ठरली, अर्सनलने सुजैनसाठी लिहिलेली पोस्ट.
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुजैन खानचा (Sussanne Khan Birthday) आज वाढदिवस. आता वाढदिवस म्हटल्यानंतर शुभेच्छांचा वर्षाव होणारच. सुजैनवरही अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. सोशल मीडियावरही सुजैनवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. यापैकी एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं.
घटस्फोटानंतर सुजैन ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ व अभिनेता अर्सनल गोनीला (Arslan Goni) डेट करत असल्याचे मानलं जातेय. मध्यंतरी या अफेअरची जोरदार चर्चा झाली आणि मग सर्व काही थंड झालं. पण आता सुजैनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सुजैन व अर्सनलच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आला आहे. कारण ठरली, अर्सनलने सुजैनसाठी लिहिलेली पोस्ट.
अर्सनल गोनीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर सुजैनसोबत एक फोटो शेअर करत तिला वेगळ्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘हॅप्पी बर्थडे डार्लिंग... तुझं हे नवं वर्ष छान जावो आणि तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येवो, ही प्रार्थना करतो,’ अशी पोस्ट अर्सनलने केली. त्याच्या या पोस्टवर सुजैननेही कमेंट केली.
‘थँक्यू यू...थँक्यू... थँक्यू यू... थँक्यू माय एव्हिरिथिंग’, अशा शब्दांत तिनं त्याचे आभार मानलेत.
अर्सनल व सुजैनच्या पोस्टवर लोकांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत.
सुजैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपला मार्ग वेगळा केला होता. मात्र घटस्फोट झाल्यानंतर ही दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिले. दोघांना अनेक वेळा व्हॅकेशनवर आणि बर्थ डे पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले.
ह्रतिकने 2000 मध्ये ‘कहो ना प्यार है’मधून डेब्यू केल्यानंतर त्याचवर्षी लग्न केले होते. सुजैन आणि हृतिकची बॉन्डिंग ब-याचदा सोशल मीडियावरही पाहायला मिळते. हृतिक जेव्हा जेव्हा अडचणीत दिसतो तेव्हा सुजैनने सोशल मीडियावर त्याला सपोर्ट करताना दिसते.
कोण आहे अर्सनल
अर्सनल हा ‘बिग बॉस 14’ फेम अली गोनीचा भाऊ आहे. तो एक अभिनेता आहे. 2017 साली ‘जिया और जिया’ या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता.