सुझान म्हणते 'तो सध्या काय करतो' ?
By Admin | Published: January 10, 2017 03:08 PM2017-01-10T15:08:23+5:302017-01-10T15:14:03+5:30
सोशल मीडियावरुन हृतिकला शुभेच्छा दिल्या. या सर्वांमध्ये हृतिकसाठी सर्वात खास आहेत ते त्याची पूर्वपत्नी सुझान खानच्या शुभेच्छा.
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - बॉलिवूडचा सुपरहिरो हृतिक रोशनने आज 43 व्या वर्षात पदार्पण केले. सकाळपासूनचं सोशल मीडियाच्या माध्यमातून हृतिकवर बॉलिवूडमधील मित्रमंडळी आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. शाहीद कपूर, जॅकलिन फर्नाडीझ, अक्षय कुमार, वरुण धवन आणि अन्य कलाकारांनी सोशल मीडियावरुन हृतिकला शुभेच्छा दिल्या.
या सर्वांमध्ये हृतिकसाठी सर्वात खास आहेत ते त्याची पूर्वपत्नी सुझान खानच्या शुभेच्छा. सुझानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हृतिकसोबतचा फोटो अपलोड करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुझानने पोस्ट केलेला हा फोटो ते दोघे एकत्र होते त्या दिवसांमधला आहे.
हृतिक आणि सुझान आता विभक्त झाले असून दोघांचे स्वतंत्र आयुष्य सुरु आहे. घटस्फोटानंतरही दोघांनी परस्परांबद्दल कधीही कडवट भाषा वापलेली नाही किंवा त्यांच्या घटस्फोटाला काय कारण ठरले त्याबद्दल खुलासा केलेला नाही. सुझानने पोस्ट केलेल्या फोटोवरुन तिच्या मनातील हृतिकबद्दलची आपुलकीची भावना दिसते. हृतिक सध्या त्याच्या काबिल चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.