स्वप्निल जोशीची कोरोना काळात गरजुंना मोठी मदत, जीवनावश्यक वस्तूंचे केले वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:34 PM2021-06-01T17:34:55+5:302021-06-01T17:39:42+5:30
मराठीसृष्टीतील अनेक कलाकार या करोनाच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करत आहेत. सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, संदीप पाठक, तेजस्विनी पंडीत, प्रिया बापट, प्रार्थना बेहरे यांच्यासारखे अनेक कलाकार जमेल तशी मदत प्रत्येकजण करत आहेत.
देशात कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर रुग्णांना बेड,ऑक्सिजन मिळणंही मुश्किल झालं आहे. परिणामी रुग्ण दगावत आहेत. अशातच अनेक सेलिब्रिटीही मदतीला धावून येत आहेत. अनेकांची रोजीरोटीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वेळेचे अन्न मिळवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बॉलिवूड कलकारांप्रमाणे मराठी कलाकारदेखील कोरोकाळात मैदानात मदतीसाठी उतरले आहेत. मराठीसृष्टीतील अनेक कलाकार या करोनाच्या लढ्यात शक्य तेवढी मदत करत आहेत. सिद्धार्थ जाधव, प्रवीण तरडे, संदीप पाठक, तेजस्विनी पंडीत, प्रिया बापट, प्रार्थना बेहरे यांच्यासारखे अनेक कलाकार जमेल तशी मदत प्रत्येकजण करत आहेत. मराठी सिनेसृष्टीचा चार्मिंग अभिनेता स्वप्निल जोशीदेखील मदतीसाठी पुढे सरसावला आहे.
भारतात कोरोना व्हायरसचे प्रमाण वाढले असल्यामुळे बऱ्याच सिनेमांचे-मालिकांचे चित्रीकरण थांबले. त्यामुळे या क्षेत्रात स्पॉटबॉय म्हणून कार्यरत असणाऱ्या लोकांना अभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नरोन्हा या दोघांनी मिळून मदतीचा हात दिला आहे. स्वप्नील आणि मॉरिस यांनी 'मीडिया बझ' या मीडिया कंपनीच्या साहाय्याने सिनेक्षेत्रात स्पॉटबॉयचे काम करणाऱ्या लोकांना शंभरहून अधिक रेशन किटचे वाटप केले आहे.
मॉरिस नरोन्हा यांनी कोरोना काळात उत्तर मुंबईतील झोपडपट्टी भागातील गरजू लोकांना गॅस सिलिंडर, रेशन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. मॉरिस यांनी कोरोना काळात आतापर्यंत केलेल्या कार्याचे सर्व स्तरावरून कौतुक होते आहे.स्वप्नील व मॉरिस यांनी एक योजना आखून बोरिवली आणि दहिसर विभागातील झोपडपट्ट्यांमध्येही गरजूंना रेशन किटचे वाटप केले. कोरोना काळात गरजू व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन स्वप्नीलने आपल्या चाहत्यांना केले आहे.सध्या चित्रीकरण महाराष्ट्रात थांबलं असल्याने अनेक कलाकार सिनेक्षेत्रातील कामं थोडी बाजूला ठेवून समाजसेवेमध्ये हातभार लावताना दिसत आहेत. आज प्रत्येक कलाकार कोरोना पिडीतांची सेवा करत आहे.