"तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला...." The Kashmir Files संदर्भातील पोस्टमुळे स्वरा भास्करवर नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 01:11 PM2022-03-15T13:11:22+5:302022-03-15T14:12:59+5:30

पुन्हा एकदा स्वराच्या तिच्या ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.

Swara bhaskar tak dig on trolling of film the kashmiri files | "तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला...." The Kashmir Files संदर्भातील पोस्टमुळे स्वरा भास्करवर नेटकरी संतापले

"तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला...." The Kashmir Files संदर्भातील पोस्टमुळे स्वरा भास्करवर नेटकरी संतापले

स्वरा भास्कर आपल्या वादग्रस्त वक्ताव्यांमुळे किंवा ट्विटमुळे नेहमी चर्चेत असते. पुन्हा एकदा स्वराच्या तिच्या ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. य स्वरा 'द कश्मीर फाइल्स'वर केलेल्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे.  स्वरा भास्करने काश्मीर फाइल्सचे नाव न घेता ट्विटरवर एक ट्विट केले, ज्यानंतर लोकांनी तिची खरडपट्टी काढली. स्वराच्‍या ट्विटनंतर लोकांनी तिला चांगलेच फटकारले आहे. 

स्वराने केलं ट्विट 
स्वराने ट्विट करून लिहिले की, स्वराने ट्विट करत लिहिलं की, 'जर तुम्हाला वाटतं की कुणी तुमच्या प्रयत्नांच्या यशासाठी तुम्हाला शुभेच्छा द्याव्या....तर गेल्या पाच वर्षापासून जे सुरू आहे त्यावर मान खाली घालून जगू नका'. असा टोल स्वराने विवेक अग्निहोत्री यांना लगावला आहे. यावर लोकांनी स्वराला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक यूजरने लिहिले, स्वराचे अभिनंदन!!!  "दुसऱ्याच्या यशाने" यशस्वीपणे लोकांचे लक्ष वेधून घेतले... पण माफ करा यावेळी फक्त १००+ रिट्विट्स... लोक काही  कामात व्यस्त आहेत असे दिसते. तर दुसऱ्याने लिहिले, तुझ्या सॉफ्ट पॉर्न सिरीजला देण्यात आलेल्या रेटिंगने हिला काही त्रास नाही. 


दरम्यान 'द काश्मीर फाइल्स' चित्रपट बनविण्यासाठी विवेक अग्निहोत्री यांनी तब्बल ५ हजार तासांचा रिसर्च केलं आहे. १५ हजार पानांचे डॉक्युमेंट एकत्र करण्यात आले आहेत, अशी माहिती विवेक अग्निहोत्री यांनी दिली. जवळपास दीड तास चाललेल्या पत्रकार परिषदेत विवेक अग्निहोत्री यांनी एक २० मिनिटांचा व्हिडिओ देखील दाखवला. यात काश्मिरी पंडितांच्या मुलाखती होत्या की जे त्यावेळी काश्मीरमध्ये उपस्थित होते. . पत्नी पल्लवी जोशीसोबत पीडित काश्मिरी पंडितांना भेटण्यासाठी जगभरातील अनेक देश आणि भारतातील अनेक शहरांमध्ये प्रवास केला. 700 हून अधिक पीडित काश्मिरी पंडितांच्या मुलाखती रेकॉर्ड केल्याचं विवेक अग्निहोत्री सांगतात.

Web Title: Swara bhaskar tak dig on trolling of film the kashmiri files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.