स्वरा भास्करचं सामान घेऊन टॅक्सी ड्रायव्हरनं काढला पळ; अभिनेत्रीनं मागितली मदत, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 03:42 PM2022-03-24T15:42:01+5:302022-03-24T15:42:23+5:30

Swara Bhaskar : आपलं सामान घेऊन पळ काढल्याचा दावा स्वरा भास्करनं केला आहे.

swara bhaskar tweet America uber driver ran away with her luggage people started-trolling-her | स्वरा भास्करचं सामान घेऊन टॅक्सी ड्रायव्हरनं काढला पळ; अभिनेत्रीनं मागितली मदत, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

स्वरा भास्करचं सामान घेऊन टॅक्सी ड्रायव्हरनं काढला पळ; अभिनेत्रीनं मागितली मदत, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Actress Swara Bhaskar) हिने आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. अमेरिकेतील लॉस एंजेल्समधील उबेर कॅब (UBER Cab) चालक आपलं सामान घेऊन पळून गेला आणि आता ड्रायव्हरशी संपर्क साधता येत नाही, असा दावा तिनं केला आहे. तसंच तिनं उबेरला टॅग करत आपलं सामान परत करण्याची मागणीही केली आहे.

स्वरा भास्करनं उबेरला ट्विटरवर टॅग करत आपली तक्रार नोंदवली आहे. "हॅलो उबर सपोर्ट, एलएमध्ये तुमचा एक ड्रायव्हर माझं सर्व ग्रोसरी सामान त्याच्या कारमधून घेऊन पळून गेला. तुमच्या अॅपवरून तक्रार नोंदवण्याची कोणतीही सोय नाही. सामान विसरले नाही, तर तो घेऊन पळून गेला आहे. मला माझं सामान परत मिळेल का?," असं तिनं विचारलं आहे.

 
यावर तिला उबर कंपनीकडूनही रिप्लाय देण्यात आला आहे. "तुमच्यासोबत जे काही घडलं त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत. कंपनीच्या इतिहासात असं कधी घडलं नाही. आम्ही तुमची तक्रा नोंदवून घेत आहोत आणि या तक्रारीची चौकशीही केली जाईल. तुम्हाला सहकार्य करण्याचा संपूर्ण प्रयत्न केला जाईल," असं कंपनीनं म्हटलं आहे.




नेटकऱ्यांनी घेतली शाळा
यानंतर स्वरा भास्करची नेटकऱ्यांनी शाळा घेतली. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सिंगल मॅन आर्मी नावाच्या एका अकाऊंटवरूनही यावर रिप्लाय देत, आम्हाला तुम्ही युएसमध्ये आहात हे सांगू इच्छित आहात का? असा प्रश्न विचारला आहे. तर रॉय नावाच्या एका युझरनं तू आंदोलन करत आपल्या सामानाची मागणी केली पाहिजे, असा मिश्किल सल्ला दिला आहे. तर एका युझरनं ती फक्त एलए मध्ये आहे दाखवू पाहत आहे, असा रिप्लाय दिला आहे. तर एका युझरनं आता मोदीजींनी राजीनामा द्यायला हवा ना, असा रिप्लाय दिला आहे.

Web Title: swara bhaskar tweet America uber driver ran away with her luggage people started-trolling-her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.