Viral Video : तो आला अन् स्वरा भास्करला ‘आएगा तो मोदी ही’ म्हणत डिवचून गेला!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 11:09 AM2019-05-09T11:09:43+5:302019-05-09T11:10:03+5:30
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या निवडणूक प्रचारात गुंतली आहे. याचदरम्यान विमानतळावर स्वराला एक चाहता भेटला. पण या चाहत्याने जे काही केले ते पाहून खुद्द स्वराही चकीत झाली.
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या निवडणूक प्रचारात गुंतली आहे. बिहारच्या बेगुसरायमध्ये कन्हैया कुमार आणि दिल्लीत आम आदमी पार्टीच्या प्रचारात स्वराने हिरहिरीने भाग घेतला. आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणा-या स्वराने निवडणूक प्रचारादरम्यानही बेधडक वृत्तीचे दर्शन घडवत आपले राजकीय विचार मांडले. याचदरम्यान विमानतळावर स्वराला एक चाहता भेटला. पण या चाहत्याने जे काही केले ते पाहून खुद्द स्वराही चकीत झाली.
होय, सध्या स्वराचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय. यात विमानतळावर एक चाहत्या स्वराला भेटायला येतो. तो स्वराला सेल्फीसाठी विनंती करतो. स्वरा तयार होते. पण सेल्फी घेण्याऐवजी हा चाहता आपल्या मोबाईलने व्हिडीओ घेतो आणि ‘मॅडम, आएगा तो मोदी ही’ म्हणत स्वराला डिवचतो. एकंदर काय तर सेल्फीच्या नावाखाली हा चाहता स्वराला चांगलाच गंडवतो.
A guy asks for a selfie @ airport; I oblige ‘coz I don’t discriminate people who want selfies based on their politics. He sneakily shoots a video. Tacky & underhand tactics r trademarks of bhakts. I’m unsurprised. But always glad 2 make bhakts feel like their lives are worthwhile https://t.co/bKyFEOKZQh
— Swara Bhasker (@ReallySwara) May 8, 2019
स्वराने हा व्हिडीओ स्वत: शेअर करत, या चाहत्यांचा समाचार घेतला. ‘मी लोकांच्या राजकीय विचारधारेच्या आधारावर भेदभाव करत नाही. पण त्याने मला गंडवून व्हिडीओ शूट केला. अशी कृत्ये भक्तांचा ट्रेडमार्क आहे. त्यामुळे मला काहीही आश्चर्य वाटले नाही. उलट भक्तांचे आयुष्य सार्थकी लावण्यात मला आनंद आहे,’असे स्वराने लिहिले. अलीकडे स्वरा भास्करने आपल्या राजकीय प्रचारादरम्यान काँगे्रसच्या जाहिरनाम्याचे कौतुक केले होते. देशाच्या संविधानाला आदर्श मानणाºया विचारधारेसोबत आपण आहोत. मी काँग्रेसचा जाहीरनामा वाचला आहे. तो माझ्या विचारांशी जुळतो. काँग्रेसचा जाहिरनामा कौतुकास्पद आहे. यामध्ये देशातील जनतेच्या मुळ प्रश्नांना हात घालण्यात आला आहे. यामध्ये अल्पसंख्याक, मागास आणि दलितांचा मुद्दा घेण्यात आला आहे. त्यात हिंसेला विरोध आहे. त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत असल्याचे स्वरा भास्करने म्हटले होते.