Swara Bhasker Haldi Ceremony : सुरू झाली स्वरा भास्करच्या लग्नाचे विधी, हळदीचे फोटो पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 12:13 PM2023-03-13T12:13:05+5:302023-03-13T12:14:10+5:30
Swara Bhasker: स्वराने गेल्या ६ जानेवारीला समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं. लग्नाची बातमी शेअर करत, तिने सर्वांनाच चकित केलं होतं. आता कपल पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहे.
Swara Bhasker Haldi Ceremony : अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. स्वराने गेल्या ६ जानेवारीला समाजवादी पक्षाचा नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं. लग्नाची बातमी शेअर करत, तिने सर्वांनाच चकित केलं होतं. आता कपल पारंपरिक पद्धतीने लग्न करणार आहे. दिल्लीत स्वराच्या आजी-आजोबांच्या घरी स्वरा विधिवत लग्नगाठ बांधणार आहे. ११ मार्चला लग्नविधींना सुरूवात झाली आहे. तूर्तास स्वरा व फहादच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्वरा व फहादच्या लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमांना ११ मार्च रोजी सुरुवात झाली आहे. नुकतेच स्वराने तिच्या आणि फहादच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. या फोटोत स्वरा हळदीसोबतच होळीही खेळताना दिसतेय.
स्वराने हळदीचे फोटो शेअर करताच, चाहत्यांनी स्वराला शुभेच्छा द्यायला सुरूवात केली. काहींनी मात्र नेहमीप्रमाणे स्वराला ट्रोल केलं. “इस्लाम धर्मात होळी खेळू शकतो?” अशी कमेंट एका युजरने केली. “बिचारा फहाद, त्याला काय काय करावं लागतंय”, अशी कमेंट अन्य एका युजरने केली.
स्वरा भास्करने करीना कपूर, सोनम कपूरसोबत 'वीरे दी वेडिंग, कंगना रनौतसोबत 'तनू वेड्स मनू', हृतिक रोशनच्या 'गुजारिश', सलमान खानच्या 'प्रेम रतन धन पायो' अशा अनेक सिनेमांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. अभिनेत्री चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सतत सोशल मीडियावर आपली रोखठोक मतं मांडताना दिसून येते.
डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनात स्वरा व फहादची पहली भेट झाली. यानंतर जानेवारी २०२० मध्ये अशाच एका आंदोलनात दोघं पुन्हा भेटले. या दोघांचा पहिला सेल्फीसुद्धा आंदोलनातीलच आहे. त्यानंतर हळूहळू दोघांचा संपर्क वाढला. मार्च 2020 मध्ये फहादने स्वराला व्हॉट्स ॲप चॅटवर त्याच्या बहिणीच्या लग्नाचंही आमंत्रण दिलं होतं. मात्र शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती लग्नाला जाऊ शकली नव्हती. बहिणीच्या लग्नासाठी निमंत्रण देणारा मॅसेज फहादने केला. यावर, सॉरी, मित्रा नाही जमणार. पण वचन देते, तुझ्या लग्नात नक्की येईल, असा रिप्लाय स्वराने त्याला दिला. पुढे गालिब नावाच्या मांजरीमुळे या दोघांमधील नातं बहरू लागलं. हळूहळू व्हिडीओ कॉलवर दोघं एकमेकांशी बोलू लागले. घट्ट मैत्री झाली आणि बघता बघता मैत्री प्रेमात बदलली. 6 जानेवारी रोजी दोघांनी कोर्ट मॅरेजसाठी कागदपत्रं जमा केली आणि दोघांचं कोर्ट मॅरेज झालं.