Besharam Rang Controversy : नट्यांचे कपडे पाहण्यापासून फुरसत मिळालीच तर..., स्वरा भास्कर नेत्यांवर भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:07 AM2022-12-16T11:07:22+5:302022-12-16T11:10:57+5:30

Besharam Rang Controversy, Swara Bhasker : ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिने दीपिकाची बाजू घेत देशातील राजकारण्यांवर निशाणा साधला आहे.

swara bhasker lashes out bjp leaders over deepika padukone pathan besharam rang controversy | Besharam Rang Controversy : नट्यांचे कपडे पाहण्यापासून फुरसत मिळालीच तर..., स्वरा भास्कर नेत्यांवर भडकली

Besharam Rang Controversy : नट्यांचे कपडे पाहण्यापासून फुरसत मिळालीच तर..., स्वरा भास्कर नेत्यांवर भडकली

googlenewsNext

Besharam Rang Controversy :शाहरूख खान (Shah Rukh Khan) व दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone)  ‘पठान’ या सिनेमाने रिलीजआधीच वाद ओढवून घेतला आहे. होय, ‘पठान’ या चित्रपटाचं ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) हे गाणं रिलीज झालं आणि देशातलं वातावरण तापलं. आता तर या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘पठान’ला बायकॉट करण्याची मागणीही सुरू झाली आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पादुकोणने घातलेल्या भगव्या बिकिनीवर भाजपा व हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. यावरून भाजपा व  हिंदू संघटना आक्रमक झाल्या असताना दीपिकाची बाजू घेणारेही अनेकजण आहेत.

काल साऊथ स्टार प्रकाश राज यांनी दीपिकाची पाठराखण केली होती. आता अभिनेत्री स्वरा भास्कर ( Swara Bhasker) हिने दीपिकाची बाजू घेत देशातील राजकारण्यांवर निशाणा साधला आहे.अलीकडे मध्यप्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी ‘बेशरम रंग’ या गाण्यावर आक्षेप नोंदवला होता. या गाण्यातील सीन्स आणि कपडे बदलले नाहीत तर ‘पठान’ मध्यप्रदेशात प्रदर्शित होऊ देणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी दिला होता. त्यांच्या या विधानावर अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट केलं आहे.

स्वराचं ट्विट

हे आहेत आपल्या देशाचे सत्ताधारी नेते... अभिनेत्रींचे कपडे पाहण्यापासून फुरसत मिळालीच तर काय माहित काही कामही करतील..., अशा आशयाचं ट्विट स्वराने केलं आहे.

साहजिकच नेहमीप्रमाणे स्वरा यावरून ट्रोल होतेय. अनेकांनी या ट्विटनंतर तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
स्वरा नेहमीच विविध मुद्द्यांवर बेधडकपणे बोलताना दिसते. अलीकडे स्वराने नादव लॅपिड याने ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केलं होतं. यावरूनही तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

Web Title: swara bhasker lashes out bjp leaders over deepika padukone pathan besharam rang controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.