Swara Bhasker : ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करने केलं ट्विट, झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 12:36 PM2022-08-18T12:36:06+5:302022-08-18T12:38:10+5:30

Laal Singh Chaddha : हृतिक रोशन, फरहान अख्तर, हुमा कुरैशी, नेहा धूपिया अशा अनेकांनी ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक केलं आणि ट्रोल झालेत. आता स्वरा भास्करने (Swara Bhasker) ‘लाल सिंग चड्ढा’च्या कौतुकात पोस्ट लिहिली आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.

Swara Bhasker Praises Laal Singh Chaddha Gets Brutally Trolled For praising Aamir Khan Film | Swara Bhasker : ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करने केलं ट्विट, झाली ट्रोल

Swara Bhasker : ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करने केलं ट्विट, झाली ट्रोल

googlenewsNext

आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’  (Laal Singh Chaddha ) या चित्रपटाचं कौतुक करणारे सगळेच सेलिब्रिटी ट्रोल झालेत. आता  अभिनेत्री स्वरा भास्कर हिने या कॉन्ट्राव्हर्सीमध्ये उडी घेतली आहे आणि यामुळे ती सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय. होय, हृतिक रोशन, फरहान अख्तर, हुमा कुरैशी, नेहा धूपिया अशा अनेकांनी ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक केलं आणि ट्रोल झालेत. आता स्वरा भास्करने (Swara Bhasker) ‘लाल सिंग चड्ढा’च्या कौतुकात पोस्ट लिहिली आणि ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली.

काय म्हणाली स्वरा?
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ एक प्रेरणादायी, संवेदनशील आणि खूपच सुंदर चित्रपट आहे. हा सिनेमा आपल्या छोट्याशा आयुष्याचं मोठेपणं दाखवतो. अगदी फॉरेस्ट गम्प सारखं. अतुल कुलकर्णी सरांनी शानदान अडॉप्टेशन केलं आहे. कभी कभी मजहब से मलेािया फैलता है..., असं तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. 

याशिवाय तिने आणखी एक ट्विट केलं. ‘लाल सिंग चड्ढा पाहतेय. या चित्रपटाने मनाला स्पर्श केला. या चित्रपटात आमिर खान हँडसम शिख दिसतो. छोटा लाल आणि छोटीशी रूपा खूपच सुंदर आहेत. मोना सिंगने भूमिकेत जीव ओतला आहे. शानदार कास्टिंग,’ अशा आशयाचं तिचं ट्विटही व्हायरल होत आहे.

काय म्हणाले ट्रोलर्स?
स्वरा भास्करने ‘लाल सिंग चड्ढा’चं कौतुक करताच ट्रोलर्सनी तिला फैलावर घेतलं. इतक्या बकवास गोष्टी लिहिण्यासाठी लॅपटॉप थिएटरमध्ये घेऊन गेली होतीस का? अशा शब्दांत एका ट्रोलरने तिला डिवचलं आहे.

 

बॉक्स ऑफिस रिपोर्टनंतर काहीही म्हणण्याची गरज नाही, असं अन्य एका युजरने लिहिलं आहे. फ्लॉप सिनेमा, हिंदू धर्माचा आदर करा, नाहीतर हेच होणार, असं एकाने लिहिलं. चित्रपट चांगला असता तर तुला ट्विट करायची गरज पडली नसती. फ्लॉप सिनेमा, अशी कमेंट एका युजरने केली.
 ‘लाल सिंग चड्ढा’च्या कमाईबद्दल सांगायचं तर सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत 85 टक्क्याने घट झाली आहे. 6 दिवसांत या चित्रपटाने केवळ 47.75 कोटी कमावले.

Web Title: Swara Bhasker Praises Laal Singh Chaddha Gets Brutally Trolled For praising Aamir Khan Film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.