माझ्या सुरक्षेपेक्षा करदात्यांचा पैसा...! कंगनाच्या ‘वाय प्लस’ सुरक्षेवरून स्वरा भास्करचा सरकारला जोरदार टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 11:59 AM2020-09-08T11:59:04+5:302020-09-08T12:04:48+5:30
कंगनाऐवजी स्वरा भास्करला वाय प्लस सुरक्षेची गरज आहे, असे ट्विट एका युजरने केले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना स्वराने कंगना आणि सरकारला टोला लगावला.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगनाला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगना 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून काही गोंधळ होऊ नये, यासाठी केंद्राने ही खबरदारी घेतली आहे. तूर्तास कंगनाला देण्यात येणा-या या वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेची जोरदार चर्चा आहे. यानिमित्ताने अभिनेत्री स्वरा भास्कर हिने केंद्र सरकारला अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
कंगनाऐवजी स्वरा भास्करला वाय प्लस सुरक्षेची गरज आहे, असे ट्विट एका युजरने केले. त्याच्या ट्विटला उत्तर देताना स्वराने कंगनाला टोला लगावला.
वाय सुरक्षेची कोणाला खरी गरज असेल तर ती स्वरा भास्करला आहे. तिला सोशल मीडियावर रोज धमक्या मिळतात. भाजपाचे व्हेरिफाईड ट्रोलर्सही तिला ट्रोल करण्यात मागे नाहीत. पण शेवटी तुमची विचारधारा काय? यावरून सगळे काही ठरते, असे ट्विट एका युजरने केले.
:) :) :) Thank uuuuu Nazma but no.. I’d rather that taxpayers money be used for real issues.. like development.. or malnutrition. 🙏🏽🙏🏽🤓🤓 https://t.co/FydU9rh56U
— Swara Bhasker (@ReallySwara) September 7, 2020
यावर उत्तर देताना स्वरा भास्करने लिहिले, ‘थँक्यू नजमा, पण नको. माझ्या सुरक्षेपेक्षा करदात्यांचा पैसा विकास, कुपोषण अशा ख-या कारणांसाठी खर्च व्हावा, असे मला वाटते,’ असे स्वरा भास्करने लिहिले. कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानाने झाली होती. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असे धमकावल्याचे सांगितले होते. संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय?असे तिने म्हटले होते. मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना प्रचंड ट्रोल झाली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी कंगनाला समज दिली होती.
मुंबईत दाखल होताच होम क्वारंटाईन
एकीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासोबत सुरू असलेले वाकयुद्ध शिगेला पोहोचले असताना ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येण्याच्या आपल्या इराद्यावर कंगना ठाम आहे. दरम्यान, आता शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका कंगनाविरोधात सक्त कारवाईच्या तयारीत आहे. सोमवारी कंगनाच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी पालिकेच्या अधिका-यांनी केली होती. त्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला मुंबईत दाखल होताच होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.
करण जोहरने भरपार्टीत माझा अपमान केला...! आमिर खानचा भाऊ फैजलचा आरोप