स्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...

By अमित इंगोले | Published: September 30, 2020 09:04 AM2020-09-30T09:04:25+5:302020-09-30T09:05:10+5:30

स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हॅंडलवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात पायल घोष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वकिल नितीन सातपुते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे एकत्र दिसत आहेत.

Swara Bhasker takes dig at Ramdas Athawale supporting Payal Ghosh | स्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...

स्वरा भास्करचा रामदास आठवलेंना टोला, म्हणाली - चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेप पीडितेला...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे. रामदास आठवले यांनी अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केलेल्या अभिनेत्री पायल घोषला समर्थन दिलं. यावरून स्वरा भास्कर म्हणाली की, चांगलं झालं असतं जर हाथरस गॅंगरेपच्या पीडितेला आणि तिच्या परिवाराला समर्थन दिलं असतं.

स्वरा भास्करने तिच्या ट्विटर हॅंडलवर एक फोटो शेअर केलाय. ज्यात पायल घोष केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वकिल नितीन सातपुते आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे एकत्र दिसत आहेत. या फोटोसोबत स्वराने लिहिले की, 'जर मंत्री आठवले यांनी हेच समर्थन हाथरसमधील बलात्कार पीडितेला आणि तिच्या परिवाराला दिलं असतं तर चांगलं झालं असतं'.

याआधी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यावर पायल घोष म्हणाली होती की, 'राज्यपाल महोदयांसोबतची माझी भेट महत्वपूर्ण ठरली. मी त्यांच्याकडे अनुरागला लगेच अटक करण्याची मागणी केली. त्यांनी पुढील कारवाईत पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं'.

दरम्यान, अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी करत पोयल घोष आणि रामदास आठवले यांनी सोमवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. याच पत्रकार परिषदेत पायलने तिच्या जीवाला धोका असल्याची शंकाही व्यक्त केली. त्यामुळे तिनेही कंगनासारखी सुरक्षेची मागणी केली आहे. 

आठवलेंनी केली अनुरागच्या अटकेची मागणी

अभिनेत्री पायल घोष हिने लावलेल्या लैंगिक गैरवर्तनाच्या आरोपांमुळे दिग्दर्शक व निर्माता अनुराग कश्यप चर्चेत आहे. पायलने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुरागवर गंभीर आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. माझ्या सुरक्षेस धोका असल्याचे पायलने म्हटले आहे. याप्रकरणी आता केंद्रीयमंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी उडी घेत अभिनेत्री पायल घोष यांनी सिनेनिर्माता अनुराग कश्यप यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. पायलच्या आरोपांची दखल घेऊन मुंबईपोलिसांनी त्वरित अनुरागला अटक करायला पाहिजे होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी होऊन पायल घोषला न्याय मिळवून दिला पाहिजे. रिपाइंचा पायल घोषला पाठिंबा राहिल, अशा आशयाचे ट्वीट केले आहे. 
 

Read in English

Web Title: Swara Bhasker takes dig at Ramdas Athawale supporting Payal Ghosh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.