"आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:42 AM2024-06-28T09:42:52+5:302024-06-28T09:43:18+5:30

T20 World Cup : टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर अभिनेता हृषिकेश जोशी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

t20 world cup marathi actor hrishikesh joshi shared post after india wins against england | "आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट

"आफ्रिका घाबरायचं बरं का...", भारताने T20 WC फायनलमध्ये धडक मारल्यानंतर हृषिकेश जोशींची हटके पोस्ट

ICC T20 World Cup 2024 : सध्या सगळीकडे टी २० वर्ल्डकपचा माहौल आहे. गुरुवारी(२७ जून) टी २० वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड हा सेमी फायनलचा मुकाबला खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडचा पराभव करत भारताने टी २० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये शानदार एन्ट्री घेतली आहे. आता टीम इंडिया जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. टीम इंडियाने फायनलमध्ये धडक मारल्यानंतर अभिनेता हृषिकेश जोशी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

हृषिकेश जोशी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहेत. त्यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेता असण्याबरोबरच ते क्रिकेटप्रेमीदेखील आहेत. टी २० वर्ल्डकपबाबत ते पोस्ट शेअर करताना दिसतात. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यानंतर हृषिकेश जोशींनी फेसबुकवर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. "रोहित, सूर्याचे हार्दिक अभिनंदन...अक्षर श: कमाल...आफ्रिका घाबरायचं बरं का...", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या हटके पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, सेमी फायनल सामन्यात इंडियाने इंग्लंडपुढे १७२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण, गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत इंग्लंडला १०३ धावातंच गुंडाळलं. कालच्या सामन्यात विराट कोहली (९) व रिषभ पंत (४) यांना अपयश आले. पण, रोहित शर्मा (५७), सूर्यकुमार यादव (४७), हार्दिक पांड्या(२३) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धुऊन काढले. रोहित ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यात अर्धशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. रवींद्र जडेजाच्या नाबाद १७ धावा व अक्षर पटेलच्या १० धावांन भारताला ७ बाद १७१ धावांपर्यंत पोहोचवले. 

Web Title: t20 world cup marathi actor hrishikesh joshi shared post after india wins against england

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.