सीतेच्या भूमिकेसाठी तिने 12 कोटी मागितले तर बिघडले कुठे? तापसी पन्नूने केली बेबोची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 11:04 AM2021-07-01T11:04:42+5:302021-07-01T11:05:54+5:30

अलीकडे करिना कपूर ट्विटरवर जबरदस्त ट्रोल झाली होती. कारण होते, सीतेची भूमिका. करिना अद्यापही यावर काहीही बोललेली नाही. पण हो, तापसी पन्नू मात्र बेबोच्या सपोर्टमध्ये समोर आली आहे.

Taapsee Pannu defends Kareena Kapoor Khan against people attacking her for hiking her fee to play Sita, asks Why not | सीतेच्या भूमिकेसाठी तिने 12 कोटी मागितले तर बिघडले कुठे? तापसी पन्नूने केली बेबोची पाठराखण

सीतेच्या भूमिकेसाठी तिने 12 कोटी मागितले तर बिघडले कुठे? तापसी पन्नूने केली बेबोची पाठराखण

googlenewsNext
ठळक मुद्देकरिनाने एका पौराणिक चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी 12 कोटींची मागणी केल्याची चर्चा होती.

अलीकडे करिना कपूर (Kareena Kapoor) ट्विटरवर जबरदस्त ट्रोल झाली होती. कारण होते, सीतेची भूमिका. होय, या भूमिकेसाठी करिनाने 12 कोटी रूपये मागितल्याची चर्चा होती. यानंतर लोकांनी बेबोला नको इतके ट्रोल  केले होते. सीतेच्या भूमिकेसाठी आम्हाला करिना नको, असे सांगत तिच्या जागी दुसरी अभिनेत्री घ्या, अशा आशयाच्या कमेंट्सचा सोशल मीडियावर अक्षरश: पूर आला होता. करिना अद्यापही यावर काहीही बोललेली नाही. पण हो, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही मात्र बेबोच्या सपोर्टमध्ये समोर आली आहे.  सीतेच्या भूमिकेसाठी करिनाने 12 कोटी मागितले तर बिघडले कुठे? असा सवाल करत तापसीने करिनाची पाठराखण केली आहे.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत तापसीने करिनाची बाजू लावून धरली. (Taapsee Pannu defends Kareena Kapoor Khan against people attacking her for hiking her fee to play Sita)

‘हिरोने फी वाढवली की कोणाला काहीही फरक पडत नाही. त्याच्यावर कोणीच टीका करत नाही. पण हिरोईनने फी वाढवली म्हटलं की, तिच्यावर टीका सुरू होते. करिनाच्या जागी चित्रपटाच्या हिरोने एका विशिष्ट रकमेची मागणी केली असती तर कोणाला काहीही फरक पडला नसता. ‘इसकी मार्केट व्हॅल्यू बढ गयी है’ म्हणत ते सर्वांनी स्वीकारलं असतं. पण हिरोईनने विशिष्ट रकमेची मागणी केल्यावर लगेच अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण एका महिलेने विशिष्ट मानधनाची मागणी का करू नये?

 करिना देशातील महिला सुपरस्टार्सपैकी एक आहे. ती जास्त मानधन मागत असेल तर तिचे काम बोलतेय.  पौराणिक चित्रपटात भूमिका साकारणारे पुरुष विनामूल्य काम करतात, असं तुम्हाला वाटतं का? मला तरी असं वाटतं नाही, असे तापसी म्हणाली.
करिनाने एका पौराणिक चित्रपटातील सीतेच्या भूमिकेसाठी 12 कोटींची मागणी केल्याची चर्चा होती. अर्थात निर्माता व दिग्दर्शकांनी या चर्चेला कोणताही दुजोरा दिला नव्हता.

Web Title: Taapsee Pannu defends Kareena Kapoor Khan against people attacking her for hiking her fee to play Sita, asks Why not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.