कच्छमधील एका कॉलेजमध्ये तापसी पन्नूच्या नावाने चालवली जाते ही गोष्ट, वाचून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 06:30 AM2020-02-24T06:30:00+5:302020-02-24T06:30:00+5:30
तापसी पन्नू व कच्छमधील कॉलेजचे कनेक्शन जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे आणि या बायोपिकना प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळतेय. आता या लिस्टमध्ये आणखी एक भर पडली आहे. तापसी पन्नू क्रिकेटपटू मिताली राजच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. त्यात आता ती आणखीन एका खेळाडूच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.
तापसी पन्नू या वर्षाच्या अखेरीस आरएसवीपीच्या रश्मी रॉकेट चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटात तापसीने कच्छमधील एका तरुण मुलीची भूमिका साकारली आहे, जिला वेगवान धावण्याची दैवी देणगी मिळाली आहे.
तापसी पन्नूने रश्मीच्या आपल्या भूमिकेसाठी तिथल्या एका स्थानिक कॉलेजमध्ये प्रशिक्षण घेतले असून त्या कॉलेजने आपल्या जिमचे नाव बदलून तापसीच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटात रश्मीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे जिला आपली प्रतिभा सिद्ध करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करवा लागतो.
आकर्ष खुरानाद्वारे दिग्दर्शित, रश्मी रॉकेटची निर्मिती रॉनी स्क्रूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल खंडडिया द्वारे करण्यात आली आहे.