'तारक मेहता'ने बदललं आयुष्य, पलक सिंधवानीला आर्थिक अडचणीमुळे करावा लागला संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 04:35 PM2022-07-22T16:35:21+5:302022-07-22T16:36:36+5:30
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सोनूची भूमिका आधी निधी भानुशालीने साकारली होती, निधीने मालिका सोडल्यानंतर पलक सिंधवानीला संधी मिळाली.पलकनेही मिळालेल्या संधीचे सोनं करत अतिशय खुबीनेही भूमिका साकारली.
मनोरंजन विश्वात काम करणारे सर्वच कलाकार श्रीमंतच असतात असे नाही. एकदा काम मिळालयला सुरुवात झाली की, त्यांची कमाई चांगली होते पण काम मिळवण्यासाठी बरंच स्ट्रगल करावं लागतं. कलाकारांना सर्वसामान्यांच्या कमाईपेक्षा कितीतरी जास्तपटीने पैसे मिळत असले तरी,काहींना मात्र अनेकदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. तारक मेहता का उल्टा चष्मा या दीर्घकाळापासून सुरु असणाऱ्या मालिकेत सोनू म्हणजेच पलक सिंधवानी सध्या चर्चेत आहे. मालिकेत काम मिळण्यापूर्वी पलकला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले होते.स्ट्रगलच्या कालावधीत प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिकण्यासारखं असतं.त्यातून स्वतःमध्ये काही ना काही बदल करत गेले. सातत्याने प्रयत्न केले. यशापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नसल्याचे पलकने सांगितलंय.
पलक सिंधवानी जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिच्या घरची परिस्थिती खूपच बिकट होती. वन बीएचके रूममध्ये ती राहतो होती. त्यांच्या घरात चांगले टेबल खुर्च्यासुद्धा नव्हत्या.दोन पैसे कमावता यावे म्हणून भावासोबत यूट्यूब चॅनल बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी 15 हजार रु. खर्च करुन घरात सजावटीचे सामान आणले होते. जेणे करुन व्हिडीओ चांगला बनेल. इतकंच काय तर 2000 वाचतील म्हणून मुंबईत अनेकदा घरंसुद्धा बदलली आहेत. तर कधी पीजीमध्येसुद्धा ती राहायची. मात्र मालिकेत काम मिळाल्यानंतर आता सगळं काही सुरळीत होत आहे. पलक आता ३ BHK फ्लॅटमध्ये राहते. सध्या ती भाड्यानेच राहत आहे. मला माझे स्वतःचे घर घ्यायचे आहे. त्यासाठी आता प्रयत्न करणार असल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सोनूची भूमिका आधी निधी भानुशालीने साकारली होती, निधीने मालिका सोडल्यानंतर पलक सिंधवानीला संधी मिळाली.पलकनेही मिळालेल्या संधीचे सोनं करत अतिशय खुबीने ही भूमिका साकारली. आज रसिकही जुन्या सोनूला विसरले आहेत आणि पलकला त्यांनी पसंती दिली आहे.