जेठालालचा 'कार'नामा! दिवाळीत खरेदी केली प्रचंड महाग गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 01:33 PM2021-11-07T13:33:04+5:302021-11-07T13:36:52+5:30

Dilip joshi: दिलीप जोशी यांनी दिवाळीच्या निमित्ताने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांच्या घरी या नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे.

taarak mehta ka ooltah chashmah dilip joshi aka jethalal buys luxury car on diwali | जेठालालचा 'कार'नामा! दिवाळीत खरेदी केली प्रचंड महाग गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क

जेठालालचा 'कार'नामा! दिवाळीत खरेदी केली प्रचंड महाग गाडी; किंमत वाचून व्हाल थक्क

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'तारक मेहता का उल्टा चष्मा'(taarak mehta ka ooltah chashmah). उत्तम कथानक आणि कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. त्यामुळे यातील कलाकार हे प्रेक्षकांना त्यांच्या घरातील सदस्याप्रमाणेच वाटतात. याच कारणास्तवर प्रेक्षकांना या कलाकारांविषयी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते. त्यातच या मालिकेतील जेठालाल हे पात्र तुफान गाजत आहे. ही भूमिका अभिनेता दिलीप जोशी(dilip joshi) करत असून ते लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. अलिकडेच दिलीप जोशी यांच्या घरी दिवाळीत एक नवा पाहुणा आला आहे.

दिलीप जोशी यांनी दिवाळीच्या निमित्ताने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांच्या घरी या नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानी यांनी त्यांच्या ट्विटरवर दिलीप जोशींसह त्यांच्या कारचे फोटो शेअर केले आहेत.

'तारक मेहता'ला मिळाले नवे नट्टू काका?; फोटो होतोय व्हायरल

दिलीप जोशींनी कोणती कार खरेदी केली?

दिलीप जोशी यांनी काळ्या रंगाची Kia Sonet subcompact SUV ही कार खरेदी केली आहे. या गाडीची किंमत जवळपास 12.29 लाख रुपये आहे. सध्या Kia सॉनेट ही गाडी विशेष लोकप्रिय ठरत असून ही कार तिच्या वेगवेगळ्या फिचर्स आणि डिझाइनमुळे लोकप्रिय होत आहे.
 

Web Title: taarak mehta ka ooltah chashmah dilip joshi aka jethalal buys luxury car on diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.