TMKOC: ‘तारक मेहता’ फेम शैलेश लोढा एका एपिसोडसाठी घ्यायचे इतके जास्त मानधन, शो सोडल्यानंतरही आहेत कोट्याधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:07 PM2023-01-19T13:07:49+5:302023-01-19T13:20:20+5:30
'मेहता साहब' ही भूमिका साकारणारे अभिनेता शैलेश लोढा यांनी मालिका काही महिन्यांपूर्वी सोडली असली तरी ते कोट्यवधी संपत्तीची मालक आहेत.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Shailesh Lodha Net Worth:‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah )हा टीव्हीवरचा कॉमेडी शो दीर्घकाळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. अगदी भारतातच नाही तर जगभर या शोचे चाहते आहेत. 'मेहता साहब' ही भूमिका साकारणारे अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी मालिका काही महिन्यांपूर्वी सोडली आहे.
एका एपिसोडसाठी घ्यायचे इतकं मानधन
शैलेश लोढा यांनी आपल्या आयुष्यातील 14 वर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला दिली आहेत. शैलेश या शोमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत होते आणि एका एपिसोडसाठी तो निर्मात्यांकडून तगडी रक्कम घ्यायचे. अवघ्या काही मिनिटांसाठी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे शैलेश लोढा एका एपिसोडसाठी सुमारे एक लाख रुपये मानधन घेत असे. शैलेश मालिका आणि इतर कार्यक्रमांतूनही लाखोंची कमाई करतात
शैलेश लोढा यांनी 'तारक मेहता' या शोमधून एक्झिट घेतली असली तरी, त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार त्यांची एकूण संपत्ती 35 ते 40 कोटी रुपये आहे. शैलेश लोढा आपली सर्वाधिक कमाई अभिनयातून करतात. शैलेश लोढा यांना अभिनयासोबतच कविता लिहिण्याचीही आवड आहे. त्याचबरोबर तो अनेक शोमध्ये होस्ट म्हणूनही दिसले आहे. ते स्वतः लेखकही आहेत. कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक असणाऱ्या शैलेश यांना महागड्या गाड्यांचीही आवड आहे.
शैलेश लोढा यांनी तारक मेहता शो का सोडला?
रिपोर्टनुसार, शैलेश लोढा आपल्या कॉन्ट्रॅक्टमुळे नाराज होते. शैलेश लोढा यांनी दिलेल्या तारखांचा योग्य वापर होत नसल्यामुळे देखील ते नाराज होते. या शोसाठी आत्तापर्यंत त्यांनी अनेक ऑफर्स सोडल्या. पण आता त्यांना आलेली संधी सोडायची नाही. नवे प्रोजेक्ट करण्याची त्यांची इच्छा होती. प्रॉडक्शन हाऊसने शैलेश लोढा यांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न केले. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले. सध्या 'तारक मेहता'ची भूमिका सचिन श्रॉफ साकारत आहे.