Tadap Trailer Out: जुनूनी इश्क की इंतहा...! अहान शेट्टीच्या ‘तडप’चा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्लॉकबस्टर’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 15:46 IST2021-10-27T15:39:51+5:302021-10-27T15:46:36+5:30
Tadap Trailer Out: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा डेब्यू सिनेमा ‘तडप’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

Tadap Trailer Out: जुनूनी इश्क की इंतहा...! अहान शेट्टीच्या ‘तडप’चा ट्रेलर पाहून तुम्हीही म्हणाल ‘ब्लॉकबस्टर’
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचा (Ahan Shetty) डेब्यू सिनेमा ‘तडप’ (Tadap Trailer) प्रदर्शनासाठी सज्ज आहे आणि आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या दमदार ट्रेलरने इंटरनेटच्या दुनियेत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मिलन लुथरिया दिग्दर्शित या सिनेमात अहानसोबत तारा सुतारिया (Tara Sutaria) लीड भूमिकेत आहे.
अहान व ताराची जबरदस्त रोमॅन्टिक केमिस्ट्री आणि दमदार अॅक्शन असलेल्या या ट्रेलरने फॅन्सला क्रेझी केलं आहे. 2 मिनिट 48 सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अहान पॉवरपॅक अंदाजात दिसतो. बाईकच्या स्टंटने ट्रेलरची सुरूवात होते आणि यादरम्यान अहान जबरदस्त फाईट करताना दिसतो. काही सेकंदानंतर ट्रेलरमध्ये ताराची एन्ट्री होती. दोघांची केमिस्ट्री , अहानचा शर्टलेस डॅशिंग लूक सगळंच जबरदस्त आहे. ट्रेलर बघता, ही एक लव्हस्टोरी आहे, हे समजतं. चित्रपटात ताराने रमिशा नामक मुलीची भूमिका साकारली आहे तर अहानने ईशान नामक पात्र जिवंत केलं आहे. दोघंही एकमेकांना खूप प्रेम करतात. पण अचानक दोघांच्या लव्हस्टोरीत एक वळण येतं.
अहान शेट्टीच्या मोठ्या बॉलीवूड पदार्पणासोबतच, हा तेलगू ब्लॉकबस्टर ‘आरएक्स 100’ चा अधिकृत हिंदी रिमेक असून थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला मोठा रोमँटिक ड्रामा आहे. हा चित्रपट 3 डिसेंबर 2021 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केला ट्रेलर
तडप या चित्रपटाचा ट्रेलर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या टिष्ट्वटर हँडलवर शेअर केला आहे. तो शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘अहान, मी तुला मोठं होतांना बघितलंय. या चित्रपटासाठीची तुझी मेहनम पाहून आणि सिनेमाच्या दुनियेत तुझी ओळख करून देताना मी खूप आनंदी आहे. मला तुझा अभिमान वाटतोय. आशीर्वाद आणि शुभेच्छा.’