Lakme Fashion Week 2019 : बाल्ड लूकमध्ये रॅम्पवर उतरली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 04:02 PM2019-02-03T16:02:11+5:302019-02-03T16:02:59+5:30

डोक्याचे मुंडण, डोळ्यांवर कूल सनग्लासेस हे लूक ताहिराने प्रचंड आत्मविश्वासाने कॅरी केले. त्यामुळे ती रॅम्पवर आली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

Tahira Kashyap walks at the Lakme Fashion Week | Lakme Fashion Week 2019 : बाल्ड लूकमध्ये रॅम्पवर उतरली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप!

Lakme Fashion Week 2019 : बाल्ड लूकमध्ये रॅम्पवर उतरली आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप!

googlenewsNext
ठळक मुद्देआयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला कॅन्सरचे निदान झाले होते.

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप सध्या कॅन्सरशी झुंज देतेय. कॅन्सरपुढे गुडघे न टेकता ताहिरा अगदी आत्मविश्वासाने या आजाराला सामोरी जातेय. काही दिवसांपूर्वी ताहिराने मुंडण केले. नकली केस लावून लावून मी थकलेय. मी केस कापेल, अशीही कल्पना  केली नव्हती. पण आज चक्क मुंडण केले. आता मुंडण केल्यावर मस्त वाटतेय, असे लिहित ताहिराने आपल्या नव्या अवताराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. आता अशाच अवतारात ताहिरा अगदी रॅम्पवर उतरली. होय, मुंबईत सुरु असलेल्या ‘लॅक्मे फॅशन वीक 2019’च्या रॅम्पवरचा ताहिराचा बाल्ड लूक सगळ्यांसाठी प्रेरणादायी होता. डोक्याचे मुंडण, डोळ्यांवर कूल सनग्लासेस हे लूक ताहिराने प्रचंड आत्मविश्वासाने कॅरी केले. त्यामुळे ती रॅम्पवर आली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.


रॅम्प वॉकचा ताहिराचा पहिला अनुभव होता. तोही, कॅन्सर झाला असताना. ताहिराने हा अनुभवही शेअर केला. हा एक सुंदर अनुभव होता. मी पहिल्यांदा रॅम्पवॉक केला. रॅम्प वॉक करताना कसे वाटते, हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. खरेच हा एक सुंदर अनुभव आहे, असे तिने सोशल अकाऊंटवर लिहिले.


ताहिरा एक प्रोफेसर आहे. शिवाय ‘टॉफी बिफोर’ नामक शॉर्ट फिल्म तिने दिग्दर्शित केली आहे. आयुष्यमान ‘अंदाधुन’ या चित्रपटात बिझी असताना ताहिराला कॅन्सरचे निदान झाले होते. ताहिराच्या या कठिण काळात आयुष्यमान कायम तिची सपोर्ट सिस्टिम बनून राहिला.

 अलीकडे कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर ताहिरा कामावर परतली होती. पण काही दिवसांपूर्वी तिचा कॅन्सर पुन्हा परतला होता. होय, ताहिराचा ब्रेस्ट कॅन्सर 1२३ अ स्टेजवर पोहोचला होता. आधी तो 0 स्टेजवर होता. साध्या सोप्या शब्दात सांगायचे तर ताहिराला दुस-यांदा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. स्वत: ताहिराने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली होती. ‘कॅन्सरबद्दल कळल्यावर तुम्ही त्याला बाहेरचा रस्ता दाखवता. पण हे अत्यंत कठीण आहे. अनेकदा आपल्याला आपल्या आतील शक्तीचा अंदाज येत नाही. माझ्या मते, आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि या अडचणीचं तुम्हाला आणखी सहनशील, शक्तीशाली बनवतात. मला स्टेज 1२३ अ कॅन्सरचे निदान झाले आहे आणि यासाठी मला १२ किमोथेरपी घ्यावा लागणार आहेत. यापैकी सहा मी घेतल्या. आणखी सहा बाकी आहेत. कॅन्सरशी झुंज देण्याच्या आत्तापर्यंतच्या माज्या प्रवासाला मी ही माझी पोस्ट समर्पित करते. अर्धा प्रवास संपला...अर्धा बाकी आहे...’ असे ताहिराने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. 
आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा १६ वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.

Web Title: Tahira Kashyap walks at the Lakme Fashion Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.