कॅन्सरशी झुंज संपली, तामिळ अभिनेते थवासी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 11:00 AM2020-11-24T11:00:33+5:302020-11-24T11:03:14+5:30
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून उपचारासाठी मागितली होती मदत
साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गजासोबत काम करणारे तामिळ अभिनेते थवासी यांचे सोमवारी निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर संपली. वयाच्या 60 व्या वर्षी थवासी यांनी अखेरचा श्वास घेतला.
सरवनन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पीटलचे एमडी डॉ. वी. सरवनन यांनी ही माहिती दिली. थवासी यांना अन्ननलिकेचा कॅन्सर होता. 11 नोव्हेंबरला त्यांना रूग्णालयात आणले गेले होते. 23 नोव्हेंबरला त्यांना आपातकालीन कक्षात हलवण्यात आले. सोमवारी रात्री 8 वाजता श्वास थांबल्याने त्यांचे निधन झाले.
குணச்சித்திர நடிகர் திரு.தவசி அவர்கள் உணவுக் குழாய் புற்றுநோயால் பாதிக்கப்பட்டு 11.11.2020 அன்று (மிகவும் முற்றிய நிலையில்) எங்களது சரவணா மருத்துவமனையில் உள்நோயாளியாக அனுமதிக்கப்பட்டார். அவருக்கு உணவுக்குழாயில் Oesophageal Stent பொருத்தியிருந்தோம்.
— Dr.P.Saravanan MD.,MLA (@mdr_saravanan) November 23, 2020
தனி அறையில் சிகிச்சை பெற்று pic.twitter.com/6XmnDwUbJX
उपचारांसाठी नव्हते पैसे, लोकांना मागितली होती मदत
अखेरच्या दिवसांत थवासी एका एका पैशासाठी मोताद झाले होते. कर्करोगाशी झुंज देत असलेल्या थवासीजवळ उपचारासाठीही पैसे नव्हते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
थवासींनी एक व्हिडीओ शेअर केला होता. एकेकाळी पिळदार शरीराचे थवासी यांचे शरीर कर्करोगाने खंगले होते. व्हिडीओत त्यांची स्थिती बघून चाहते हळहळले होते.
थवासींनी साऊथ इंडस्ट्रीत जवळपास 3 दशकांच्य करिअरमध्ये अनेक सिनेमात सहाय्यक भूमिका साकारल्या. कीजहक्कु चीमाईले, अन्नथा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
एकेकाळी पिळदार शरीर असलेल्या या अभिनेत्याची अशी झालीये अवस्था, उपचारासाठीही नाहीत पैसे