तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी भाषेतही होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 06:30 AM2019-12-07T06:30:00+5:302019-12-07T06:30:02+5:30

अजय देवगणच्या तान्हाजी: द अनसंग वॉरीयर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे.

Tanhaji: The Unsung Warrior Based On Tanaji Malusare To Release In Marathi | तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी भाषेतही होणार प्रदर्शित

तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठी भाषेतही होणार प्रदर्शित

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रात हा सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना अजय देवगन सांगतो, “एका शूर मराठा योद्ध्याची कथा हिंदी भाषेसह त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार आहे, हे मी माझे भाग्यच समजतो.

शूरवीर मराठा योद्धा तान्हाजी मालुसरे यांच्या दिमाखदार जीवनाची छाप भारतीय इतिहासावर आजही कायम असून आता मराठी भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. दृश्यात्मक रोमांचाने परिपूर्ण असलेला तान्हाजी: द अनसंग वॉरीयर हा सिनेमा मराठीत प्रदर्शित होत असून संपूर्ण महाराष्ट्रात 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. 

एका महान योद्धाची कथा मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आल्याने त्यातून मिळणारा अनुभव हा अद्भुत असणार आहे. शिवाय महाराष्ट्रात हा सिनेमा मराठी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहे. याविषयी माहिती देताना अजय देवगन सांगतो, “एका शूर मराठा योद्ध्याची कथा हिंदी भाषेसह त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. ज्या पद्धतीने संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत, त्याच दिमाखदार प्रवासाची अनुभूती समस्त महाराष्ट्राने घ्यावी असे मला वाटते.”

मराठी आवृत्तीविषयी बोलताना काजोल सांगते, “मला ही मराठी व्यक्तिरेखा निभावणे प्रचंड भावले. मी आजीच्या, पणजीच्या मायेखाली लहानाची मोठी झाले. मी त्यांना पाहायचे. मी माझा स्वत:चा भूतकाळ जगले असे या चित्रपटात काम करताना मला वाटले. मी माझ्या आईच्या साड्या नेसून बालपणीचा खेळ खेळतेय असेच वाटत होते. जणू मी सिनेमात माझ्या आईचीच भूमिका वठवतेय असे मला सतत वाटत होते. मला संधी मिळाली तर मी रेड कार्पेटवर देखील नऊवारी साडी नेसून जाईन! हा पेहराव परिधान करायला मला खूप आवडला. साडीत स्वत:ची अशी एक देहबोली (बॉडी लॅग्वेज) तयार होते. साडीत बाईपण खुलून येते. सावित्री ही व्यक्तिरेखा कणखर आणि अफलातून आहे. माझ्यात तिच्यातले करारीपण चपखल उतरले. मी अत्यंत प्रतिकूल स्थितीतल्या तिच्या रुबाबाच्या प्रेमात आहे."

 तान्हाजी: द अनसंग वॉरीयर या चित्रपटाचा मराठी ट्रेलर 10 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन अभिनित तान्हाजी - द अनसंग वॉरीयरची निर्मिती अजय देवगनच्या एडीएफ आणि भूषण कुमारच्या टी-सिरीजने केली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा ओम राऊतने सांभाळली आहे. 

Web Title: Tanhaji: The Unsung Warrior Based On Tanaji Malusare To Release In Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.