तू तिथे हजर होतीस का? झोमॅटो बॉयची बाजू घेणाऱ्या परिणीती चोप्राला तनुश्री दत्ताचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 03:00 PM2021-03-17T15:00:45+5:302021-03-17T15:02:44+5:30
झोमॅटो इंडिया, मी त्याची कशी मदत करू शकते, ते कृपया सांगा, असे ट्विट परिणीतीने केले होते. आता परिणीतीच्या या ट्विटला उत्तर देत अभिनेत्री तनुश्री दत्ता मैदानात उतरली आहे.
झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय आणि बेंगळुरूतील एका महिलेने केलेले त्याच्यावरचे आरोप सध्या चर्चेत आहेत. ऑर्डर रद्द केल्यामुळे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. मात्र यानंतर आरोप झेलणा-या त्या डिलिव्हरी बॉयने वेगळीच आपबीती सांगितली होती. मी नाही तर त्या महिलेनेच मला मारहाण केली होती, असा उलट आरोप त्याने केला होता. हे प्रकरण गाजत असताना आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने या वादात उडी घेतली होती. तुमचा हा डिलिव्हरी बॉय निर्दोष आहे, याची मला खात्री आहे. झोमॅटो इंडिया, मी त्याची कशी मदत करू शकते, ते कृपया सांगा, असे ट्विट परिणीतीने केले होते. आता परिणीतीच्या या ट्विटला उत्तर देत अभिनेत्री तनुश्री दत्ता मैदानात उतरली आहे. झोमॅटो बॉयची बाजू घेणा-या परिणीतीला तनुश्रीने चांगलेच सुनावले आहे.
होय, तनुश्रीने इन्स्टावर पोस्ट शेअर करत, घटनास्थळी तू हजर होतीस का? असा खोचक सवाल परिणीतीला उद्देशून केला आहे.
काय म्हणाली तनुश्री?
महिलांवर अत्याचार करणारे पुरूष शिक्षेच्या भीतीने कधीच गुन्हा कबूल करत नाही. स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी ते रडतील, पडतील, हवं ते करतील. आजपर्यंत भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात कोणत्याही पुरुषाने गुन्हा कबुल केलेला नाही. जर त्या तरुणीने डिलिव्हरी बॉयला पैसे दिले नाहीत, ऑर्डर परत केली, चपलेने मारले, शिवीगाळ केली तर तो पोलिसांकडे का गेला नाही? पब्लिसिटीसाठी कुणी महिला स्वत:लाच मारून घेणार का? आणि ती पब्लिसिटी करत असताना तो डिलिव्हरी बॉय तिच्या उपचाराचा खर्च का करतोय? काही सेलिब्रिटींनी अचानक या प्रकरणात त्या डिलिव्हरी बॉयची बाजू घेतलीये. डिलिव्हरी बॉयचा पुळका आलेल्यांना मी एवढेच विचारू इच्छिते की, घटनास्थळी तुम्ही हजर होतात का? तिथे काय घडले तुम्हाला माहिती आहे का? 4.5 रेटिंगमुळे तो डिलिव्हरी बॉय सभ्य ठरतो का? असे तनुश्री दत्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे. शिवाय संबंधित फूड डिलिव्हरी सर्व्हिसला अनसबस्क्राइब करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.
मी त्याची कशी मदत करू शकते सांगा...! झोमॅटोच्या ‘कामराज’ला परिणीती चोप्राची साथ
परिणीती चोप्राने काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर ट्विट केले होते. ‘झोमॅटो इंडिया कृपया या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि आलेला रिपोर्ट सार्वजनिक करा. जर तो व्यक्ती निर्दोष असेल तर त्या महिलेविरोधात कारवाई करण्यासाठी मदत करा. हा प्रकार अमानविय आहे. तो व्यक्ती निर्दोष असल्याची मला पुर्ण खात्री आहे. कृपया मी त्या व्यक्तीला कशी मदत करु शकते याबाबत मला मार्गदर्शन करा,’ असे परिणीतीने तिच्या ट्विटमध्ये म्हटले होते.
ऑर्डर रद्द केल्यामुळे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. मात्र यानंतर आरोप झेलणा-या त्या डिलिव्हरी बॉयने वेगळीच आपबीती सांगितली होती. मी नाही तर त्या महिलेनेच मला मारहाण केली होती, असा उलट आरोप त्याने केला होता.