"कर्मा इज...", मैत्रिणीसोबत Ex बॉयफ्रेंडचा रोका होताच तारा सुतारियाची क्रिप्टिक पोस्ट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 11:31 AM2024-11-24T11:31:03+5:302024-11-24T11:32:18+5:30
आदर जैन हा आलेखा अडवाणीसोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार असताना तारा सुतारियाची पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेत्री करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचा भाऊ आदर जैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आदर जैन याने लेडीलव्ह अलेखा आडवाणी हिला समुद्रकिनारी प्रपोज करत लग्नाची मागणी घातली होती. सध्या दोघांच्याही लग्नाची तयारी सुरू आहे. यातच आदर जैनची एक्स गर्लफ्रेंड आणि बी-टाऊन अभिनेत्री तारा सुतारियाने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
आदर जैन हा आलेखा अडवाणीसोबत आयुष्याची नवी इनिंग सुरू करणार असताना तारा सुतारियाची पोस्ट चर्चेत आली आहे. नुकतंच आदर जैन आणि आलेखा यांचा रोका सोहळा काल रात्री मुंबईत पार पडला. ज्यामध्ये बॉलिवूड स्टार्स सहभागी झाले होते. यावेळी तारा सुतारियाने पोस्ट करत लिहलं, "आत्ता माझ्या हातात शोम हकचे नवीन पुस्तक आहे. कर्मा इज अ बिच... हे पुस्तक वाचण्यासाठी मी फार उत्सुक आहे".
दरम्यान, आदर जैन हा कपूर कुटुंबातील रीमा जैन यांचा मुलगा आहे. याआधी तो तारा सुतारियासोबत रिलेशनशिपमध्ये होता. 2023 मध्ये या जोडप्याचे ब्रेकअप झाले. यांच्या ब्रेकअपच कारण आलेखा असल्याची चर्चा आहे. आलेखा अडवाणी ही तारा आणि आदर यांची खास मैत्रीण होती. तारा सुतारियाने फार कमी वेळात हिंदी चित्रपटसृष्टीत आपला खास ठसा उमटवला आहे. तर आलेखा एक उद्योजिका आहे. मुंबईत अलेखा हिचा व्यवसाय आहे.