'तारक मेहता..' मधील रोशन भाभीने खटला जिंकला! असित मोदींना मोठा दंड, नेमकं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 05:34 PM2024-03-26T17:34:01+5:302024-03-26T17:38:36+5:30
तारक मेहता... मधील रोशन भाभी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री असित मोदींविरुद्धची कायदेशीर लढाई जिंकलीय. असित मोदींना इतकी रक्कम नुकसानभरपाई म्हणून द्यावी लागणार आहे.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. तिने तारक मेहका.. शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. आता या प्रकरणात कोर्टाने निकाल दिलाय. 'तारक मेहता...'शी संबंधित लैंगिक छळ प्रकरणात, जेनिफर मिस्त्री बन्सीवालच्या बाजूने निकाल देण्यात आला असून निर्माते असित मोदी ही केस हरले आहेत.
कोर्टाच्या निकालानुसार असित यांना जेनीफरला 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेनिफर मिस्त्रीने निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर अभिनेत्रीने कार्यकारी निर्माते जतिन बजाज आणि ऑपरेशन हेड सोहेल रमाणी यांच्या विरोधातही तक्रार दाखल केली होती. पवई पोलिसांनी असित मोदींविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 354 आणि 509 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर प्राणघातक हल्ला किंवा बळजबरी) अंतर्गत FIR नोंदवला होता. कोर्टाचा निकाल जेनिफरच्या बाजूने लागला असला तरीही याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Jennifer Mistry Bansiwal, known for playing Mrs Sodhi in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah, had accused producer Asit Kumarr Modi of sexual harassment in 2023. The actress has won the case as Modi has been ordered to pay her Rs 25 lakh in total.#tellytalk#exclusive#news… pic.twitter.com/zTA2empjmT
— Telly Talk (@TellyTalkIndia) March 26, 2024
'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असितला त्याची थकबाकी भरण्यासाठी अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर जेनिफरने सांगितले की, तिचे पेमेंट थांबवण्यासाठी निर्मात्याला अतिरिक्त फी भरावी लागेल, जी सुमारे 25 ते 30 लाख रुपये असेल. छळवणुकीबद्दल बोलायचं तर, असित कुमार मोदींना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.