Taarak Mehta च्या बबीताजीने केला असा काही डान्स, VIDEO पाहून जेठालालची उडाली असेल झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 11:57 AM2021-11-25T11:57:09+5:302021-11-25T11:58:46+5:30

मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ने बुधवारी रात्री इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केल. ज्यात ती लाल आणि काळ्या रंगाचा पॅंट घालून आहे.

Tarak Mehta fame Munmum Dutta aka babita ji dances video viral | Taarak Mehta च्या बबीताजीने केला असा काही डान्स, VIDEO पाहून जेठालालची उडाली असेल झोप

Taarak Mehta च्या बबीताजीने केला असा काही डान्स, VIDEO पाहून जेठालालची उडाली असेल झोप

googlenewsNext

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Tarak Mehta Ka Ultah Chashma) फेम मुनमुन दत्ता म्हणजे बबीताजी सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. आता कृष्णन अय्यरची पत्नी आणि जेठालालची क्रश असलेल्या मुनमुनने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती मेघन ट्रेनरचं गाणं 'आय वांट बी मी टू' वर ठुमके लगावताना दिसत आहे. या व्हिडीओतील तिच्या डान्स मुव्ह्स् बघून प्रत्येकजण तिच्यावर फिदा होत आहे.

मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ने बुधवारी रात्री इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केल. ज्यात ती लाल आणि काळ्या रंगाचा पॅंट घालून आहे. ती डान्स करताना फारच सुंदर दिसत आहे. तिचं हे वेगळं टॅलेंट लोकांना समोर आल्याने तिचे फॅन्सही आनंदी आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं की, 'कारण हे ट्रेंड करत आहे'. काही वेळातच तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काही तासात या व्हिडीओला २ लाख २५ हजारपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मुनमुनच्या या पोस्टवर हजारो फॅन्स कमेंट करत आहेत. त्यातील एकाने लिहिले की, 'ही मुलगी नेहमीच इतकी सुंदर कशी दिसते?'. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'तुमचे अनेक फोटो इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आहेत. पण तुमचा डान्स त्याहूनही सुंदर आहे'. 

काही दिवसांपूर्वी मुनमुन दत्ताच्या अफेअरची चर्चा मीडियात रंगली होती. तिचा बॉयफ्रेन्ड म्हणून मालिकेतील टप्पू म्हणजे राज अनादकतचं नाव समोर आलं होतं. ही बातमी व्हायरल झाल्यावर मुनमुन संतापली होती. तिने एक लांबलचक पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती.
 

Web Title: Tarak Mehta fame Munmum Dutta aka babita ji dances video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.