‘मांजा’ चित्रपटाच्या टीमची

By Admin | Published: July 15, 2017 02:18 AM2017-07-15T02:18:56+5:302017-07-15T02:18:56+5:30

‘जास्त खेचला तर काचू शकतो. ढील दिली तर खाली येऊ शकतो

The team of 'Manza' movie | ‘मांजा’ चित्रपटाच्या टीमची

‘मांजा’ चित्रपटाच्या टीमची

googlenewsNext

लोकमत आॅफिसला भेट
‘जास्त खेचला तर काचू शकतो. ढील दिली तर खाली येऊ शकतो. असा पालक आणि मुलांच्या नात्यामधला समतोल शिकवणारा ‘मांजा’. अशी ‘मांजा’ या चित्रपटाच्या नावात दडलेली व्याख्या सहजसोप्या पद्धतीने अश्विनी भावे यांनी नुकतीच लोकमतला दिलेल्या भेटीदरम्यान सांगितली. ‘या चित्रपटात नव्या दमाचे दोन तरुण कलाकार सुमेध मुद्गलकर आणि रोहित फाळके दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा पालक आणि मुलांना एकमेकांविषयीची भूमिका जाणून घ्यायला मदत करेल. विशेषत: चित्रपटाचे संगीत म्हणजे चित्रपटाचा एक अविभाज्य भाग आहे.’ असे त्या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाल्या. चित्रपटाचे दिग्दर्शक जतीन वागळे म्हणाले, ‘हा एक थरारपट आहे. मुलांच्या मानसिकतेला नव्याने मांडणारी पण त्याचबरोबर पालकत्वाबद्दल ठोस भाष्य करणारी चित्रपटाची कथा आहे. अश्विनी भावे यांच्यासोबत चित्रपटाचे काम करताना एक कम्फर्ट झोन तयार झाल्याने एकमेकांच्या कल्पना शेअर करता आल्या.’ त्यांनी चित्रपटाच्या संगीताविषयी बरीच माहिती सांगितली. ते म्हणाले,‘कथानक आणि गाण्याचा वेग समान असेल तर गाण्याची सौंदर्यस्थाने दिसून येत नाहीत. गाण्याच्या शेवटी कथेतील सर्व पात्रांना ते गाणे लागू होईल अशा प्रकारे शब्द व संगीत ह्या चित्रपटात दिसेल.’
‘विकी’ ची भूमिका करणाऱ्या सुमेधसाठी हे पात्र म्हणजे ड्रीम रोल होता असं तो म्हणाला. तो सांगत होता की, प्रथम मला ही भूमिका जमेल की नाही अशी भीती वाटत होती. पण हे पात्र व भोवताली गुंफलेले कथानक खूप रोचक असल्याने मी झटून काम केले. अश्विनी मॅडमनी वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले.‘जयदीप’ नावाच्या अत्यंत अबोल, शांत स्वभावाच्या मुलाची भूमिका करणारा रोहित म्हणाला, ‘विकी व जयदीप ही दोन्ही पात्रे एकमेकांना पूरक अशी आहेत. या पात्रांमध्ये आम्ही दोघेही अगदी चपखल बसलो आहोत.’
अश्विनी भावे यांनी मराठी चित्रपटांच्या वाटचालीविषयी भाष्य केले. त्या म्हणाल्या, ‘पूर्वीही चित्रपटांचा आशय दर्जेदार होता आजही आहे. पण मराठी प्रेक्षकाचे नेमके मर्म सापडले नाही असे एकंदरीत चित्र आहे. कलाकारांसाठी मात्र नवनवीन संधीची दारे उघडी आहेत.’ चित्रपटाचे निर्माते के. आर. हरीश यांनी सांगितले की, ‘या सिनेमातून ते प्रथमच मराठी चित्रपटात निर्माता म्हणून पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचे संगीत हा चित्रपट आणि प्रेक्षक यांच्यातला महत्त्वाचा दुवा आहे. २१ जुलै रोजी ‘मांजा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस
येत आहे.

Web Title: The team of 'Manza' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.