डोळ्यात पाणी...सुजलेला चेहरा..., मानसी नाईकसोबत विभक्त झाल्यानंतर प्रदीपची अवस्था पाहून चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 06:02 PM2023-01-08T18:02:14+5:302023-01-08T18:02:53+5:30
अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) आणि पती प्रदीप खरेरा (Pardeep Kharera) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत सोशल मीडियावर चर्चेत राहत आहेत.
अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) आणि पती प्रदीप खरेरा (Pardeep Kharera) लवकरच घटस्फोट घेणार आहेत. तेव्हापासून या दोघांमधील तू तू मै मै सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत हे दोघे सोशल मीडियावर चर्चेत राहत आहेत. प्रदीप खरेराने आपल्याला फसवलं असा आरोप मानसीने केल्यापासून प्रदीप देखील शायरी अंदाजात किंवा रिलच्या माध्यमातून मानसीवर पलटवार करण्यास सुरुवात केली. दरम्यान आता प्रदीपने सोशल मीडियावर काही रिल शेअर केले आहेत. ज्यात तो रडताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
अभिनेत्री मानसी नाईकचा पती प्रदीपने एक रील शेअर केला. त्यात त्याची अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. डोळ्यात पाणी ,रडून रडून चेहरा डोळे सुजलेले अशा अवस्थेत तो तेरी बेवफाई कॅप्शन देताना म्हणतो की,’ घर की दिवरों पर नाखून से लिखेंगे तेरी बेवफाई को हम सुकून से लिखेंगे, शाही से लिखे खत को फाड देती हो तुम खत अबकीबार हम खून से लिखेंगे’.
प्रदीपच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी त्यांना पुन्हा एकत्र संसार थाटण्याचा सल्ला दिला आहे. या अगोदर देखील प्रदीपने सोशल मीडियावर राडतानाचे रील शेअर केले होते मात्र त्यावर मानसीने खोटे अश्रू अशी प्रतिक्रिया दिली होती. जिथे प्रदीप पार्ट्या करण्यात व्यस्त असतो, दोन दोन तरुण मुलींसोबत रिल्स बनवतो तिथे त्याचे अश्रू किती खोटे आहेत हे मला माहित आहेत अशी पोस्ट मानसीने केली होती. मात्र आजच्या व्हिडिओत प्रदीपची अवस्था खूपच वाईट दिसत आहे. त्याचा सुजलेला चेहरा आणि सुजलेले डोळे पाहून तो रात्रभर रडत होता की काय अशी शंका त्याच्या चाहत्यांना आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रदीपने तर आपल्या मागील तीन वर्षांचा आढावा एकाच पोस्टमध्ये जाहीर केला. २०२० हे वर्ष मला स्वतःला पूर्णपणे बदलवून गेलेले ठरले. तर २०२१ व्या वर्षात मी आतून पूर्णपणे कोलमडून गेलो, २०२२ हे वर्ष माझे डोळे उघडवणारे ठरलं तर २०२३ या नवीन वर्षात मी स्वतःला परत मिळवले.अशा आशयाची एक पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली. तर दुसरीकडे मानसी नाईकने मात्र या दुःखातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या करिअरवर ती पूर्णपणे लक्ष्य केंद्रित करत आहे.
मानसीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली त्यात ती म्हणते की, काही लोक मला म्हणतात तू खूप बदलली आहेस. यावर ती उत्तर देते की ‘हो , सॉफ्टवेअर अपडेट झालेय माझे.’ असे ती म्हणत असली तरी दुसरीकडे मात्र प्रदीप खरेरा पूर्णपणे कोलमडून गेल्याचे भासवत आहे. काही वेळेला तो मानसीला प्रतिउत्तर देताना दिसला आहे तर काही वेळेला तो आतून पूर्णपणे कोलमडून गेलेला दिसला आहे.