मंगळागौरसाठी तेजश्रीने केला २ तास सराव, लवकरच पाहायला मिळणार सारा थाट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 11:12 AM2019-08-23T11:12:11+5:302019-08-23T11:17:41+5:30
मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिका रसिकांची पसंतीस पात्र ठरत आहे.
'होणार सून मी ह्या घरची' मालिकेतील जान्हवीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री तेजश्री प्रधानने पुन्हा एकदा 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केले आणि या मालिकेनेही अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे मालिका रसिकांची पसंतीस पात्र ठरत आहे.
नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि शुभ्रा तिच्या सासूबाईंकडे मंगळागौर करण्याची इच्छा व्यक्त करते. त्यामुळे आसावरी एकदम खुश होते आणि उत्साहाने तयारीला लागते. मंगळागौर म्हंटल कि डोळ्यासमोर येतात ते म्हणजे खेळले जाणारे खेळ. या खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणतात. या मंगळागौरीच्या चित्रीकरणासाठी तेजश्रीने चक्क २ तास सराव केला. झिम्मा, फुगडी आणि मंगळागौरीचे पारंपरिक खेळ खेळण्यासाठी तसेच चित्रीकरण करताना कुठलीही चूक होऊ नये म्हणून तेजश्रीने योग्य सराव केला. दिग्गज कलाकारांचा मेळ असलेल्या मालिकेने सुरू होण्याआधी प्रोमो रिलीज झाला तेव्हाच मालिकेची सा-यांना उत्सुकता लागली होती. अपेक्षेप्रमाणे मालिकेतील रंजक कथानकामुळे मालिका इतर मालिकांप्रमाणे हिट ठरत असल्याचे पाहायला मिळतंय.
या मालिकेचे आणखीन खास वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा आशुतोष हा मुलगा असून अग्गंबाई सासूबाईच्या आधी त्याने काही मालिकांमध्ये काम केले होते. त्याचसोबत त्याचा 'वन्स मोअर' हा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनय हे आशुतोषचं पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर यांच्या अॅकॅडमीमध्ये त्याने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून आशुतोष घराघरात पोहोचला. त्याला या मालिकांमुळे चांगली लोकप्रियता देखील मिळाली.