अस्सल मराठमोळी आहे तेजस्वी प्रकाश; मराठी कुटुंबात वाढलेल्या अभिनेत्रीने सांगितलं तिचं आडनाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:35 AM2023-04-17T11:35:21+5:302023-04-17T11:38:20+5:30

Tejaswi prakash: 'अनेकांना वाटतं मी साऊथ इंडियन आहे. पण, तसं नाहीये', असं म्हणत तेजस्वीने तिचं आडनाव सांगितलं.

tejaswi prakash revealed what is her surname and what people think about it | अस्सल मराठमोळी आहे तेजस्वी प्रकाश; मराठी कुटुंबात वाढलेल्या अभिनेत्रीने सांगितलं तिचं आडनाव

अस्सल मराठमोळी आहे तेजस्वी प्रकाश; मराठी कुटुंबात वाढलेल्या अभिनेत्रीने सांगितलं तिचं आडनाव

googlenewsNext

एकता कपूरच्या (Ekta kapoor) नागिन मालिकेमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तेजस्वी प्रकाश(tejaswi prakash) . बिग बॉस (bigg boss) या रिअॅलिटी शोमुळे तेजस्वीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. त्यामुळे सध्या छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. तेजस्वीच्या प्रोफेशनल लाइफसोबतच बऱ्याचदा तिच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा रंगताना पाहायला मिळते.यात तिच्या आडनावाची चर्चा होताना दिसत आहे. 

हिंदी विश्वात झळकलेल्या तेजस्वीने 'मन कस्तुरी रे' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर आता रोहित शेट्टीच्या पहिल्यावहिल्या स्कूल कॉलेज आणि लाईफ या मराठी सिनेमात झळकणार आहे. या निमित्ताने तिने 'लोकमत'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी भाष्य केलं. यात तिने तिचं आडनावही सांगितलं.

"मी तेजस्वी प्रकाश असं नाव लावते त्यामुळे माझं नेमकं आडनाव काय हा प्रश्न अनेकांना पडतो. काहींना तर असंही वाटतं की मी साऊथ इंडियन आहे आणि प्रकाश माझं आडनाव आहे. पण, माझं आडनाव वायंगणकर आहे", असं तेजस्वी म्हणाली.

दरम्यान, तेजस्वीचं खरं आडनाव ऐकल्यावर रोहित शेट्टीलाही धक्का बसला. आजपर्यंत त्यालाही तिचं आडनाव माहित नव्हतं. स्कूल कॉलेज आणि लाईफ या सिनेमाची निर्मिती रोहित शेट्टी करत असून प्रथमेश परब मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
 

Web Title: tejaswi prakash revealed what is her surname and what people think about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.