मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घालावी का? तेजस्विनी पंडीत थेटच बोलली...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 07:37 PM2023-10-22T19:37:12+5:302023-10-22T19:51:55+5:30
बिकिनी अवतारात मराठी अभिनेत्रींना पाहिल्यानंतर त्यांना ट्रोल केलं जातं. यावर तेजस्विनी पंडीतने परखडपणे तिचं मत मांडलं.
मराठी अभिनेत्री आणि बिकिनी ही गोष्ट सध्या खूपच चर्चेत आहे. बॉलीवूडमधील अभिनेत्रीने ‘बिकनी’ घालणे ही तशी सर्वसाधारण बाब आहे. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींचा बिकनीतील बोल्ड लूक आपण पाहिला आहे. परंतु, मराठी चित्रपटसृष्टीत बिकनी अवतारात अभिनेत्रींना पाहिल्यानंतर लोक नाक मुरडतात. त्यांना ट्रोल केलं जातं. यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने अगदी परखडपणे तिचं मत मांडलं.
नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने तेजस्विनीने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मराठी अभिनेत्री जेव्हा बिकिनी घालतात. तेव्हा खूप ट्रोल होतात. त्यावर तुझं म्हणणं काय, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनवर पैसे आकारले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक कमेंटचे १० रुपये. तरचं त्याचं स्वरुप बदलेल. माझं शरीर चांगलं आहे. मला आवडतात हे कपडे. मी घातले तर यात काहीच गैर नाही.
पुढे ती म्हणाली, 'बरं स्विमिंग पुलमध्ये बिकिनी नाही घालणार तर मग कुठे घालणार. जगण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत म्हणजे तुमच्या पद्धतीने, नाहीतर लोकांच्या पद्धतीने. मग तसं वागलं पाहिजे. बिकिनी घातली तर सोशल मीडियावर फोटो टाकल्यावर खालचे कमेंट वाचायचे नाहीत आणि ट्रोल झालं तरी फरक नाही पडला पाहिजे. नाहीतर मग लोकांना वाटतं तसं वागलं पाहिजे'.
सोशल मीडियावर ट्रोलर्सवर ती म्हणाली, माझ्या काही मैत्रिणीने अपत्य जन्माला घालायचे नाही, असा निर्णय घेतला. म्हणजे नवरा आणि बायकोचा हा खाजगी निर्णय आहे. पण, त्यावर लोकांनी फार वाईट कमेंट केल्यात. त्या कमेंट मला येथे सांगता येणार नाहीत'. तेजस्विनीची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गुलाबाची कळी बनून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी तेजस्विनी पंडित कायमच सोशल मीडियावर सक्रीय असते. तर निरनिराळ्या कारणांमुळे ती चाहत्यांमध्येही चर्चेत असते. तेजस्विनीने आपल्या कामातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. निरनिराळ्या भूमिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येते. अभिनयाशिवाय ती निर्मिती क्षेत्रातही उतरली आहे. 'बांबू' हा तिचा पहिलाच निर्मित चित्रपट आहे.