‘डान्स महाराष्ट्र डान्स’ मध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी रंगणार १२ धमाकेदार परफॉर्मन्सेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 04:10 AM2018-04-19T04:10:07+5:302018-04-19T09:47:27+5:30

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान ...

12 bomber performances will be played for wild card entry in 'Dance Maharashtra Dance' | ‘डान्स महाराष्ट्र डान्स’ मध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी रंगणार १२ धमाकेदार परफॉर्मन्सेस

‘डान्स महाराष्ट्र डान्स’ मध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी रंगणार १२ धमाकेदार परफॉर्मन्सेस

googlenewsNext
दार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. स्पर्धकांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नेहमीच उत्तमोत्तम परफॉर्म करून घेण्याची जबाबदारी या कार्यक्रमाचे तीन परीक्षक म्हणजेच सिद्धार्थ जाधव, फुलवा खामकर आणि  आदित्य सरपोतदार चोख पार पाडत आहेत. अभिनेता सुव्रत जोशीचे मनोरंजक सूत्रसंचालन प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. या आठवड्यात १२ धमाकेदार स्पर्धकांमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्रीसाठी चुरशीचा सामना रंगणार आहे. झी युवाने रसिक प्रेक्षकांना दिलेल्या डिजिटल ऑडिशनच्या सुवर्ण संधीचं प्रेक्षकांनी सोनं केलं आणि याच डिजिटल ऑडिशनद्वारे तसेच स्पर्धेतून बाद झालेल्या स्पर्धकांपैकी काही स्पर्धक वाईल्ड कार्ड एंट्रीसाठी निवडण्यात आले आहेत. १२ स्पर्धकांपैकी फक्त काही लकी स्पर्धक डान्स महाराष्ट्र डान्सचे विजेतेपद मिळवण्यासाठी पुढे जाऊ शकतील. डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर पहिल्यांदा वाईल्ड कार्ड स्पेशल परफॉर्मन्सेसमध्ये सुप्रसिद्ध बेली डान्सर सना पिंडारे हिचा ‘अप्सरा आली’ या लोकप्रिय गाण्यावर एक मनमोहक बेली डान्स सादर होणार आहे. स्पर्धक हर्ष पटेल ‘लयभारी’ या चित्रपटातील ‘विठ्ठल विठ्ठल’ या गाण्यावर थिरकणार आहे तसेच प्रेक्षक क्रेझी डान्स क्रू चा 'कास्ट डिफरंस' वर एक स्पेशल ऍक्ट पाहू शकणार आहेत.

Web Title: 12 bomber performances will be played for wild card entry in 'Dance Maharashtra Dance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.