​२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ च्या टीमने सैनिकांसोबत साजरा केला आर्मी दिन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 11:56 AM2018-01-15T11:56:46+5:302018-01-15T17:26:46+5:30

२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका सैनिकांच्या जीवनावर आधारित असल्याने या मालिकेच्या ...

21 Sarfarosh: The Sarnagarh 1897 team celebrated with the army Army Day | ​२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ च्या टीमने सैनिकांसोबत साजरा केला आर्मी दिन

​२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ च्या टीमने सैनिकांसोबत साजरा केला आर्मी दिन

googlenewsNext
सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ही मालिका सैनिकांच्या जीवनावर आधारित असल्याने या मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांनी भारतीय सैन्यदलाच्या सीख रेजिमेंटच्या सैनिकांसोबत आर्मी दिन साजरा केला. अभिनेते मोहित रैना आणि मुकुल देव यांनी स्वतः सीख रेजिमेंटच्या सैनिकांना आमगांव येथील सेटवर नेले. सध्या या मालिकेची टीम सारागाऱ्हीच्या भव्य युद्धाचे चित्रीकरण करत आहे. २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका ब्रिटिश इंडियन आर्मीच्या ३६ व्या सीख रेजिमेंटच्या २१ धैर्यशाली सैनिकांच्या वास्तविक जीवनकथेवरून प्रेरणा घेऊन बनवण्यात आली आहे.
काँटिलो पिक्चर्स प्रा.लि.ची निर्मिती असलेली २१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ ही मालिका नवीन मनोरंजन वाहिनी डिस्कव्हरी जीतवर १२ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासून या मालिकेविषयी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच उत्सुकता आहे. काँटिलो पिक्चर्सचे सीईओ अभिमन्यू सिंग या मालिकेविषयी सांगतात, “सीख रेजिमेंटमधील सैनिक आमच्या मालिकेच्या स्टुडिओमध्ये आर्मी दिनानिमित्त आले हा आमचा सन्मान आहे. सारागाऱ्हीचे युद्ध भारतीय इतिहासातील सर्वांत धैर्यशाली युद्धांपैकी एक असून आम्ही या सैनिकांना त्यांच्या धैर्य आणि निडरतेसाठी सलाम करतो.”
२१ सरफरोशः सारागाऱ्ही १८९७ या मालिकेतील नायक मोहित रैना सांगतो, “आर्मी दिनाच्या निमित्ताने सीख रेजिमेंटच्या सैनिकांचे त्यांच्या परिवारांसोबत आदरातिथ्य करताना आम्हाला खरंच खूप छान वाटले. मी हवलदार ईशर सिंगची भूमिका साकारत असल्याने सैनिकांचे जीवन मला आता अधिक जवळचे वाटू लागले आहे. सैनिक आपल्या कुटुंबियांचा विचार न करता आपल्या मातृभूमीसाठी सगळं काही समर्पित करायला तयार असतात. आपले सैनिक सगळ्‌या अडथळ्‌यांना आणि प्रत्येक आव्हानांना पार करत सगळ्या संकटांना तोंड देत असतात. त्यामुळेच आपण आपल्या आयुष्याचा खरा आनंद घेऊ शकतो. मी खरोखरच्या त्यांच्या चैतन्याला सलाम करतो. मी एका सैनिकाची भूमिका साकारत असल्याने त्यांचे खरे आयुष्य कसे असते याची मला जाणीव झाली आहे. 

Also Read : मोहित रैनाने त्याच्या आणि मॉनी रॉयच्या नात्याबद्दल केला हा खुलासा

Web Title: 21 Sarfarosh: The Sarnagarh 1897 team celebrated with the army Army Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.