UPSC ची तयारी करणाऱ्या मुलीला २५ लाखांच्या या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही! तुम्हाला माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:08 IST2024-12-10T13:08:10+5:302024-12-10T13:08:43+5:30
KBC 16 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका मुलीला २५ लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. काय होता हा प्रश्न जाणून घ्या

UPSC ची तयारी करणाऱ्या मुलीला २५ लाखांच्या या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही! तुम्हाला माहितीये?
अभिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या KBC 16 ची सध्या चांगलीच चर्चा आहे. गेले अनेक सीझन त्याच उत्साहात आणि जोशपूर्ण अंदाजात अमिताभ बच्चन KBC 16 चं सूत्रसंचालन करत आहेत. KBC 16 मध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक पार्श्वभूमीचे स्पर्धक भेटीला येत आहेत. KBC 16 मध्ये नुकतंच UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुलगी सहभागी झाली होती. पण या मुलीला २५ लाखांच्या एका प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. तुम्हाला माहितीये का?
काय होता २५ लाखांचा प्रश्न?
UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी ट्विंकल नावाची मुलगी KBC 16 मध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिला २५ लाखांचा प्रश्न विचारण्यात आला. लाइफलाइन घेऊनही ट्विंकलला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. काय होता २५ लाखांचा प्रश्न? जाणून घ्या...
प्रश्न: किस देश ने अपने झंडे पर एक मुकुट जोडने का निर्णय लिया, जब १९३६ ऑलिम्पिक में देखा गया कि वो हैती के झंडे से मिलता जुलता है? ऑप्शन A.मोनाको B. लिकटेंस्टीन C.लक्जेमबर्ग D.माल्टा.
प्रश्नाचं योग्य उत्तर काय?
या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं B. लिकटेंस्टीन. मित्र आणि उपस्थित प्रेक्षकांची मदत घेऊनही ट्विंकलला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. त्यामुळे तिला हा खेळ सोडावा लागला. ट्विंकलचं लग्न झालं असून ती लग्नानंतर UPSC ची तयारी करतेय. ती लवकरच आई होणार आहे. KBC 16 मध्ये आल्यावर ट्विंकलने होणाऱ्या बाळासाठी खास टीशर्ट आणलं होतं. त्यावर तिने अमिताभ बच्चन यांचा ऑटोग्राफ मागितला. बिग बींनी तिला अनेक आशीर्वाद दिले.