एकाच मराठी चित्रपटात ३५ बालकलाकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2016 10:41 AM2016-03-06T10:41:51+5:302016-03-06T03:47:26+5:30

या स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे नाही पडावी या विचाराने पालक मुलांवर अपेक्षांचं ओझे टाकतात. त्यामुळे लहान मुलांचे बालपण ...

35 children in single Marathi film | एकाच मराठी चित्रपटात ३५ बालकलाकार

एकाच मराठी चित्रपटात ३५ बालकलाकार

googlenewsNext
स्पर्धेच्या युगात आपली मुले मागे नाही पडावी या विचाराने पालक मुलांवर अपेक्षांचं ओझे टाकतात. त्यामुळे लहान मुलांचे बालपण हरवत चालले का? हा मोठा प्रश्न सध्या समाजासमोर आ वासून उभा राहिला आहे. या परिस्थितीचा विचार करून दिग्दर्शक करिण गावडे यांनी सहा गुण हा चित्रपटातून मुलांच्या बालपणावर कसा परिणाम होतो यावर प्रकाश टाकला आहे. त्यामुळे या चित्रपटात किल्ला फेम अर्चित देवधर सहित ३५ बालकलाकारांनी अभिनय केला आहे.तसेच अमृता सुभाष व सुनिल बर्वे हे मुख्या भूमिकेत झळकणार आहेत. तर अतुल तोडणकर, प्रणव रावराणे, आरती सोळंकी या कलाकारांचादेखील या चित्रपटात समावेश आहे.या चित्रपटाची गाणी संगीतकार राज पवार व कपिल रेडकर संगीतबद्ध केली असून सुरेश वाडकर, कपिल रेडकर, रविंद्र खोमणे, राज पवार यांच्या आवाजात गाणी ऐकण्यास मिळणार आहे.

Web Title: 35 children in single Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.