“३६ गुणी जोडी” मालिकेतील वेदांत म्हणतोय, मराठीमध्ये काम करणं आव्हानात्मक होते, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 04:44 PM2023-03-09T16:44:45+5:302023-03-09T16:50:45+5:30
३६ गुणी जोडी' ही एकमेकांपासून विरुद्ध असणाऱ्या दोन व्यक्तींची कथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे,
३६ गुणी जोडी' ही एकमेकांपासून विरुद्ध असणाऱ्या दोन व्यक्तींची कथा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली ही मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. ह्या मालिकेची टॅग लाईनच आहे ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’. ही मालिका आता एका रोमांचक वळणावर आहे.
या भूमिकेबद्दल बोलताना आयुष म्हणाला, मी सध्या या मालिकेत साकारत असलेले वेदांत हे पात्र मी वास्तविक जीवनात जे आहे त्याच्या अगदी विरुद्ध आहे. प्रामाणिकपणे मी ज्या पात्राची भूमिका साकारणार होते त्याची जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी थक्क झालो कारण हे पात्र खूप मनोरंजक वाटत होते. मी खूप शांत व्यक्ती आहे, मी कधीही कोणावर रागावलो नाही आणि मी म्हटल्याप्रमाणे वेदांत पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचा आहे, तो एक रागीट, उद्धट आणि गर्विष्ठ माणूस आहे. तो त्याच्या आयुष्यात परिपूर्ण माणूस आहे.
पुढे आयुष म्हणाला, मला नेहमीच अभिनेता व्हायचे होते. पण माझ्याकडे उत्तम मराठी बोलण्याचे कौशल्य नाही, कारण मी यूएस मध्ये होतो. मराठीमध्ये काम करणं हे एक आव्हान होते. कारण मला आव्हाने स्विकारणं आवडते. याआधी आयुष 'बॉस माझी लाडाची'मध्ये फेम मिहीरची भूमिका साकारताना दिसला होता.