देबिनाचा अतिशहाणपणा! खेळता खेळता मुलीला लटकवलं उलट; नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 11:48 IST2024-02-09T11:47:14+5:302024-02-09T11:48:03+5:30
Debina Bonnerjee देबिनाने तिच्या धाकट्या मुलीसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

देबिनाचा अतिशहाणपणा! खेळता खेळता मुलीला लटकवलं उलट; नेटकऱ्यांनी केलं जबरदस्त ट्रोल
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) सध्या तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे. टीव्हीवरील रामायण या गाजलेल्या मालिकेत सीता ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेल्या देबिना दोन मुलींची आई असून त्यांच्या संगोपनात सध्या व्यस्त आहे. मात्र, घर, संसार सांभाळण्यासोबतच ती चाहत्यांच्याही संपर्कात आहे. देबिना कायम तिच्या लेकींसोबतचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र, यावेळी एका व्हिडीओमुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.
देबिनाने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये देबिना आणि तिचा नवरा गुरमीत दोघंही त्यांच्या धाकट्या लेकीसोबत खेळत आहेत. मात्र, हा गेम खेळत असताना त्यांनी अचानक तिला उलटलं लटकवलं ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
काय म्हणाले नेटकरी?
'तुम्हा दोघांना कळतंय का तुम्ही काय करताय ते?' असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'हे सगळं शो ऑफसाठी चाललंय', 'त्या लहान बाळाची मान लचकेल जरा विचार करा', 'हे दोघे जरा अतिशहाणपणाच करतात', 'देबिना किती वयस्कर दिसतीये', अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
दरम्यान, देबिना दोन लेकींची आई असून प्रेग्नंसीनंतर अनेकांनी तिला वाढलेल्या वजनावरुन ट्रोल केलं. मात्र, या ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करत देबिना तिचं आईपण एन्जॉय करत आहे.