महेश भट्ट यांच्या 'दिल जैसे धडके धडकने दो' मालिकेसाठी पहिल्यांदाच ६ वर्षाच्या मुलाने केले रॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2020 07:15 AM2020-02-02T07:15:00+5:302020-02-02T07:15:00+5:30
'दिल जैसे धडके धडकने दो' ही मालिका लवकरच येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला
स्टार प्लस वाहिनीवर 'दिल जैसे धडके धडकने दो' या नावीन्यपूर्ण नावाची एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची कल्पना असून गुरोदेव भल्ला या मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. त्यांनी २०१६ मध्ये स्टार प्लससाठी नामकरण नावाची मालिका प्रदर्शित केली होती. हा यशस्वी कॉम्बो पुन्हा अनुभवायला मिळणार आहे दिल जैसे धाडके धडकने दोच्या निमित्ताने. या मालिकेच्या निमित्ताने दोन नविन बाल कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जेरेड अल्बर्ट सविलीये आणि हिरवा त्रिवेदी.
दोन लहान मुलांची गोष्ट असून नियतीने त्यांची केलेली थट्टा व त्यांचे एकमेकांवरील प्रेम याचे अनोखे बंधन यात पाहायला मिळेल. नुकताच या मालिकेचा टीझर लाँच करण्यात आला, तो पाहताच या दोन्ही मुलांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. यात भर म्हणजे सहा वर्षांचा अल्बर्ट रॅपर बनलाय.
हा सहा वर्षांचा चिमुरडा सिल्व्हर स्क्रीन वर पहिल्यांदा रॅपर बनणार आहे. अल्बर्ट रामायणावर त्यांच्या पद्धतीने रॅप करणार असून त्याचे शब्द तल्हा सिद्दीकी यांचे आहेत. हा चिमुरडा रॅपर श्रीरामाच्या रुपात येऊन भारतीय पुरणाचा अनुभव त्याच्या शब्दात प्रेक्षकांना देणार आहे.
यावर आपले अनुभव सांगताना तो म्हणतो, मी पहिल्यांदा रॅप करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच हे माझ्यासाठी आव्हानच होतं. पहिले तर मला रॅप कसे करतात हे शिकावं लागलं आणि शब्द पाठ करावे लागले आणि त्यानंतर गाव लागलं. पण हा परफॉर्मन्स करताना मला फार मज्जा आली. यासाठी मला माझ्या पूर्ण टीमने खूप मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
दिल जैसे धडके धडकने दो लवकरच स्टार प्लस वर दाखल होणार आहे.