कोण म्हणेल गरोदर आहे! ७ महिन्यांच्या प्रेग्नंट अभिनेत्रीचं जोरदार वर्कआऊट, जीममधील व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 12:04 PM2024-08-06T12:04:04+5:302024-08-06T12:04:57+5:30

Drishti Dhami Pregnant : ७ महिन्यांची गरोदर तरी जोरदार वर्कआऊट करतेय अभिनेत्री, प्रेग्नंट मधुबालाचा जीममधील व्हिडिओ व्हायरल

7 months pregnant drishti dhami heavy workout gym video goes viral | कोण म्हणेल गरोदर आहे! ७ महिन्यांच्या प्रेग्नंट अभिनेत्रीचं जोरदार वर्कआऊट, जीममधील व्हिडिओ व्हायरल

कोण म्हणेल गरोदर आहे! ७ महिन्यांच्या प्रेग्नंट अभिनेत्रीचं जोरदार वर्कआऊट, जीममधील व्हिडिओ व्हायरल

सेलिब्रिटी आणि कलाकार त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. अनेकदा त्यांचे योगा क्लास आणि जीममधील व्हिडिओही व्हायरल होत असतात. आता अशाच एका अभिनेत्रीचा व्हिडिओ समोर आला आहे. सात महिन्यांची गरोदर असूनही ही अभिनेत्री जीममध्ये जोरदार वर्कआऊट करताना व्हिडिओत दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ही अभिनेत्री म्हणजे मधुबाला फेम दृष्टी धामी आहे.

काही महिन्यांपूर्वीच दृष्टीने आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. सोशल मीडियाववर नवऱ्याबरोबरचे फोटो पोस्ट करत दृष्टीने आईबाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर प्रेग्नंसीच्या काळातील अनेक व्हिडिओही तिने शेअर केले होते. आता दृष्टी धामीच्या जीममधील व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ७ महिन्यांची गरोदर असलेली दृष्टी ट्रेनरच्या साहाय्याने वर्कआऊट करताना दिसत आहे. या व्हिडिओत तिचा बेबी बंपही स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीला असं वर्कआऊट करताना पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 


हा वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत दृष्टीने आरोग्याचं महत्त्व पटवून देण्याबरोबरच चाहत्यांपुढे एक नवा आदर्शही ठेवला आहे. पण, त्याबरोबरच तिने पूर्णपणे काळजी घेऊन असं वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला आहे. "डॉक्टर किंवा ट्रेनरच्या देखरेखीशिवाय असं वर्कआऊट घरी किंवा कुठेही करू नका", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दृष्टी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'गीत','मधुबाला','दिल मिल गए','परदेस मे है मेरा दिल' ,'एक था राजा एक थी रानी' या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिने 'द एम्पायर','दुरंगा' या वेबसीरिजमध्येही ती झळकली होती. तिने २०१५ साली बिझनेसमन नीरज खेमकासोबत लग्नगाठ बांधली. आता लग्नानंतर ९ वर्षांनी आईबाबा होणार असल्यामुळे ते दोघेही आनंदी आहेत. ऑक्टोबर महिन्यात दृष्टी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. 

Web Title: 7 months pregnant drishti dhami heavy workout gym video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.