'दंगल नया साल धमाल'मध्ये मनोरंजनाचा धमाका, मोनालिसाचा दमदार डान्स परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 06:39 PM2022-12-26T18:39:20+5:302022-12-26T18:41:17+5:30

जलेबी भाऊजी म्हणजेच अली असगर आणि हर्ष लिंबाचिया 'दंगल नया साल धमाल' या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत.

A blast of entertainment in 'Dangal Naya Saal Dhamaal', Monalisa's powerful dance performance | 'दंगल नया साल धमाल'मध्ये मनोरंजनाचा धमाका, मोनालिसाचा दमदार डान्स परफॉर्मन्स

'दंगल नया साल धमाल'मध्ये मनोरंजनाचा धमाका, मोनालिसाचा दमदार डान्स परफॉर्मन्स

googlenewsNext

सुट्टीचा हंगाम नुकताच सुरू झाला आहे आणि तुम्ही तुमचे सेलिब्रेशन प्लान करणारच असाल, तेव्हा भारताची आघाडीची जीईसी दंगल टीव्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे मनोरंजन, मजा-मस्ती, नाच-गाणी आणि धम्माल नाट्य असलेली रात्र. 'दंगल नया साल धमाल' शो दंगल टीव्हीवर प्रसारित होणार आहे. 

जलेबी भाऊजी म्हणजेच अली असगर आणि हर्ष लिंबाचिया या शोचे सूत्रसंचालन करणार आहेत. या दोघांच्या शहरी आणि ग्रामीण तडक्याच्या आयकॉनिक मिक्समुळे अँकरिंगला वेगळीच चव येणार आहे. हे दोघेही शहरी आणि ग्रामीण पार्टी प्लानर्स म्हणून दिसणार आहेत आणि दोघेही एकमेकांच्या व्यवसायासाठी आतुर असतील.त्यांचा विनोद आणि एकाहून एक सुंदर सादरीकरणामुळे ही एक धमाल रात्र होणार आहे. तेव्हा सज्ज व्हा, भन्नाट सादरीकरणांसाठी. हे परफार्मन्सेस सादर करतील सिंदूर की किमत मधील वैभवी हनकारे (मिश्री), बिंदिया सरकारमधील सोनल खिलवानी (बिंदिया), जनम जनम का साथ मधील निक्की शर्मा (विधी), इश्क की दास्ताँ-नागमणी मधील आलिया घोष (पारो), आदित्य रेडिज (शंकर) आणि आणखीही खूप जण.


तुमची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी फावरा चौकमधली मोनालिसा (रमा) बेली डान्स सादर करणार आहे. इश्क की दास्ताँ मधील इम्रान (दुर्जन सिंह) आणि सिकंदर खरबंदा (हरिशंकर) हे दोघे बिंदिया सरकारमधील नीलू (बर्फी देवी) हिच्यासह 'ठुमकेश्वरी' हा क्लासिक अॅक्ट करणार आहेत आणि या मजेशीर अॅक्टमध्ये भर घालणार आहेत सौदा खरा खराचा संपूर्ण दंगल परिवार. 

Web Title: A blast of entertainment in 'Dangal Naya Saal Dhamaal', Monalisa's powerful dance performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.