मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा २२ वर्षांचा संसार आला संपुष्टात, घेतला घटस्फोट, म्हणाली - "खूप..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:23 IST2025-03-04T13:22:47+5:302025-03-04T13:23:20+5:30

या अभिनेत्रीने नवऱ्याकडून घेतली नाही पोटगी

A famous Marathi actress Shubhangi Atre's 22-year marriage ended, she got divorced, she said - ''Very...'' | मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा २२ वर्षांचा संसार आला संपुष्टात, घेतला घटस्फोट, म्हणाली - "खूप..."

मराठमोळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा २२ वर्षांचा संसार आला संपुष्टात, घेतला घटस्फोट, म्हणाली - "खूप..."

हिंदी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाभीजी घर पर हैं' (Bhabhiji Ghar Par Hai)मधून अंगुरी भाभीच्या भूमिकेतून अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) घराघरात पोहचली. तिने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. मालिकेतून तिने अनेक लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. मात्र तिला तिच्या खऱ्या आयुष्यात खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. २००३ मध्ये शुभांगीचे पियुष पुरेसोबत लग्न झाले होते. मात्र, गेल्या काही वर्षांत त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ५ फेब्रुवारीला शुभांगी आणि पियुषचे २२ वर्षांचे नाते संपुष्टात आले आणि दोघांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला. त्याला एक मुलगी देखील आहे, तिचे नाव आशी आहे.

शुभांगी अत्रे हिने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने तिच्या नात्याबद्दल सांगितले. शुभांगी म्हणाली की, हे खूप वेदनादायी होते. मी या नात्यात पूर्णपणे गुंतले होते. काही वर्षांनंतर माझ्यात आणि पियुषमध्ये खूप बदल होऊ लागले, पण आता मी या नात्यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे आता मला खूप हलके वाटते आहे. माझ्यावरील एक ओझे दूर गेले आहे. मला स्वातंत्र्य मिळाले आहे. माझ्या भावना व्यक्त करणे माझ्यासाठी कठीण आहे. आता मला माझी मुलगी आशीवर पूर्ण लक्ष द्यायचे आहे, जेणेकरून ती तिच्या आयुष्यात नेहमी आनंदी राहील.”

अभिनेत्रीला मिळाला  मोठा धडा
शुभांगीला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, या नात्यातून ती काय शिकली? त्यावर ती म्हणाली की, माझा सर्वात मोठा धडा हा आहे की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कधीही दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. जर तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांची वाट पाहत असाल, तर तुमचे आयुष्य संपेल आणि शेवटी तुम्हाला नेहमीच पश्चात्ताप होईल. जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोकही सकारात्मक वाटतात.

अभिनेत्रीने घेतली नाही पोटगी
शुभांगी पुढे म्हणाली की, आई म्हणून तिला तिच्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे आहे, जर तिला तिच्या वडिलांना भेटायचे असेल तर ती भेटू शकते. ती कधीही त्यांच्या मार्गात येणार नाही. दोघांनीही हे वेगळेपण चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. शुभांगीने आशीच्या शिक्षणाची आणि इतर सर्व जबाबदारी घेतली आहे. तिने कधीही तिच्या पतीकडून किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून काहीही मागितले नाही.

Web Title: A famous Marathi actress Shubhangi Atre's 22-year marriage ended, she got divorced, she said - ''Very...''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.