टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला ट्रकनं दिली धडक; अपघातातून थोडक्यात बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 12:53 PM2022-12-06T12:53:09+5:302022-12-06T12:53:34+5:30

शूटिंगवरून घरी परतत असताना झाला अभिनेत्रीचा अपघात

A famous television actress Hetal Yadav car was hit by a truck; narrowly escaped the accident | टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला ट्रकनं दिली धडक; अपघातातून थोडक्यात बचावली

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कारला ट्रकनं दिली धडक; अपघातातून थोडक्यात बचावली

googlenewsNext

हिंदी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री हेतल यादव(Hetal Yadav)चा अपघात झाला आहे. हेतल रविवारी रात्री शूटिंगवरून घरी परतत असताना एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली. या अपघातात सुदैवाने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र या घटनेनंतर तिला मानसिक धक्का बसला आहे.

या अपघाताबद्दल हेतल यादवने सांगितले की, रविवारी रात्री ८.४५ च्या सुमारास ती पॅकअप करून फिल्मसिटीहून निघाली होती. अभिनेत्री जेव्हीएलआर हायवेवर पोहोचताच एका ट्रकने तिच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात तिची कार उड्डाणपुलाच्या काठावर येऊन महामार्गावरून खाली पडणार होती. मात्र तिने कशीतरी हिंमत दाखवून गाडी थांबवली आणि ताबडतोब आपल्या मुलाला फोन करून पोलिसांना कळवण्यास सांगितले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेनंतर अभिनेत्रीला धक्का बसला आहे. या अपघातात अभिनेत्रीला कोणतीही इजा किंवा दुखापत झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. यासाठी तिने देवाचे आभारही मानले आहेत. अभिनेत्री म्हणाली की सुदैवाने मला दुखापत झाली नाही. पण तिला मानसिक धक्का बसला आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये केलंय काम 
हेतल यादव हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. 'इमली'मध्ये ती शिवानी राणाची भूमिका साकारत आहे. तसेच तिने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय शोमध्येही 'ज्वाला'ची भूमिका साकारली आहे. हेतल यादवने इंडस्ट्रीत डान्सर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. पण नंतर तिने अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले.

Web Title: A famous television actress Hetal Yadav car was hit by a truck; narrowly escaped the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.